पीक विमा भरण्याकडे दुर्लक्ष
बुलडाणा: गत चार वर्षांपासून शेतकऱ्यांवर सतत अस्मानी संकटाचे मोठे सावट राहत असल्याने शेतकरी दरवर्षी पिकांचा विमा उतरवत आहेत; परंतु मागील वर्षीचा पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
पीक कर्जाचा टक्का वाढेना
बुलडाणा: खरिपाची पेरणी पूर्ण होत आली आहे; परंतु अद्यापही अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात झालेल्या पीक कर्ज वाटपाचा टक्का तुलनेने कमी दिसत आहे.
निंबोळी अर्काचा वापर करण्याचे आवाहन
मेहकर: आजच्या आधुनिक शेतीत दिवसेंदिवस रासायनिक पद्धतीचा वापर वाढत आहे. यामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. फायदेशीर जिवाणूंचे प्रमाणही कमी होते. याला पर्यायी म्हणून निंबोळी अर्कसारखे विविध सेंद्रिय वस्तूंचा उपयोग करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
बोंडअळीची कपाशी उत्पादकांमध्ये भीती
बुलडाणा: गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बोंडअळीमुळे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून, गतवर्षी कपाशीच्या पेऱ्यावर याचा परिणाम झाला होता. यावर्षी मात्र कपाशीचा समाधानकारक पेरा झाला असून, शेतकरी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करताना दिसत आहेत.