बुलडाणा, दि. ३ : श्री. संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर येथून शेगावच्या परतीच्या मार्गावर आहे. पालखीचे १ ऑगस्ट रोजी सिंदखेड राजा येथे आगमन झाल्यानंतर पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली आहे. पालखी ८ ऑगस्ट रोजी खामगाव येथे येत असून, सकाळी १0 ते सायं ७ वाजेपयर्ंत खामगाव शहरातून प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करणार आहे. पालखीचा मुक्काम श्री. देवजी खिमजी मंगल कार्यालय खामगाव येथे राहणार आहे. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजता पालखीचे शेगावकडे प्रयाण होणार आहे. पालखीतील भाविकांची संख्या व नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर होणारी गर्दी बघता खामगाव ते शेगाव, खामगाव- नांदुरा व बाळापूर नाका ते एसटी स्टँण्ड या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.बाळापूर नाका ते एसटी स्टँण्ड या मार्गावरील ८ ऑगस्ट रोजी सकाळी १0 ते दुपारी १२ वाजेपयर्ंत वाहतूक बाळापूर नाका- जनुना ढाबा- घाटपुरी- नांदुरा रोड- एमआयडीसी टनिर्ंग- सुटाळा बु.- जलंब नाका व बसस्टँण्ड या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. तसेच खामगाव ते नांदुरा रस्त्यावरील वाहतूक ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपयर्ंत खामगाव बसस्टँण्ड- बाळापूर नाका- जनुना ढाबा- घाटपुरी- नांदुरा रोड- एमआयडीसी टनिर्ंग- पुढे नांदुराकडे, जलंब जाण्याकरिता पुढे सुटाळा खुर्द व जलंब नाक्यापासून पुढे पर्यार्यी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. खामगाव- नांदुरा राष्ट्रीय महामार्ग दोन तासांपयर्ंत वाहतुकीसाठी बंद ठेवून पर्यायी मागार्ने वाहतुकीसाठी खुला राहील. खामगाव ते शेगाव रस्ता ९ ऑगस्ट रोजी सकाळी ४ ते सायं ५ वाजेपयर्ंत खामगाव बसस्टँण्ड ते शेलोडी, तिंत्रव मार्गे शेगांव, खामगांव बसस्टँण्ड ते जलब नाका- पुढे शेगावकडे वाहतूक या पर्यायी मार्गाने राहणार आहे. खामगाव ते शेगाव रस्ता १२ तासांपयर्ंत संपूर्ण वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या आदेशातून सर्व शासकीय वाहने, सर्व अतिमहत्त्वाच्या/महत्त्वाच्या व्यक्तींची वाहने, तत्काळ सेवेची रुग्णवाहिका, शववाहिनी, अग्निशमन दलाची वाहने व जीवनावश्यक वस्तूंची वाहने वगळण्यात आली आहेत.
संत श्री गजानन महाराजांची पालखी सोमवारी खामगावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2016 1:10 AM