संदीप गायकवाड यांचा शिवसेनेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:38 AM2021-08-19T04:38:21+5:302021-08-19T04:38:21+5:30

मागील दहा ते पंधरा वर्षांपासून धर्मवीर व शिवसंग्राम संघटना या चळवळीत राहून जिल्हाभर सामाजिक कार्यात भरीव कामगिरी करून ...

Sandeep Gaikwad joins Shiv Sena | संदीप गायकवाड यांचा शिवसेनेत प्रवेश

संदीप गायकवाड यांचा शिवसेनेत प्रवेश

Next

मागील दहा ते पंधरा वर्षांपासून धर्मवीर व शिवसंग्राम संघटना या चळवळीत राहून जिल्हाभर सामाजिक कार्यात भरीव कामगिरी करून वेगळी ओळख ठेवून असणारे व संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये सामाजिक व राजकीय कामाचा वेगळा ठसा उमटवून युवा नेतृत्व म्हणून अल्पावधीत कालावधीमध्ये नावारूपास आलेले संदीप गायकवाड यांनी शिवसंग्राम संघटनेचे जिल्हा अध्यक्षपदावर नियुक्ती होताच जिल्हाभर संघटना वाढवली होती. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड यांच्या कामावर प्रभावित होऊन मातोश्री कार्यालय येथे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात व शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष जालिंदर बुधवत, महिला आघाडी अध्यक्ष चंदा बढे, युवा नेते कुणाल गायकवाड याच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. प्रवेशानंतर शहरातील गांधी भवन येथे मोठ्या प्रमाणात संदीप गायकवाड यांचे हजारो समर्थक उपस्थित झाले तेथून आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री संपर्क कार्यालयापर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जिल्ह्यातून हजारो महिला-पुरुष सहभागी झाले होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात जिल्हा सरचिटणीस नितेश थिगळे, वाहतूक जिल्हा अध्यक्ष गजानन पाटील, कामगार जिल्हा अध्यक्ष शेख शगीर, तालुकाप्रमुख संजय चव्हाण, रमेश वखरे, मुकुंद साखरे. उपतालुका प्रमुख योगेश गायकवाड माळवंडीचे सरपंच संजय वाघ, दुधाचे सरपंच गणेश निकम, सिंदखेडचे सरपंच मनीषा संदीप बिलारी, सिंदखेड उपसरपंच शशिकला उबरहंडे, सदस्य सुलोचना चिकटे, महिला नेत्या आसराबाई मुरडकर यांच्यासह असंख्य शिवसैनिकांची उपस्थित होती.

Web Title: Sandeep Gaikwad joins Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.