संग्रामपूर: पाच संदिग्ध रूग्णांचे अहवाल दुसऱ्यांदाही निगेटीव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 03:06 PM2020-04-11T15:06:49+5:302020-04-11T15:06:59+5:30

तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Sangrampur: Five suspected patients report negative | संग्रामपूर: पाच संदिग्ध रूग्णांचे अहवाल दुसऱ्यांदाही निगेटीव्ह!

संग्रामपूर: पाच संदिग्ध रूग्णांचे अहवाल दुसऱ्यांदाही निगेटीव्ह!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील पाच संशयीतांचा अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आला. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
गत काही दिवसांपूर्वी तालुक्यातील बोडखा, तामगाव, व काकनवाडा या तीन गावातील प्रत्येकी दोन असे सहा नागरीक दिल्ली येथून एका धार्मिक कार्यक्रमातून परतले होते. त्यामुळे तालुका प्रशासनाने सहा पैकी पाच जणांना ३ एप्रिल रोजी शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब नमुने औरंगाबाद येथील विषाणू संशोधक व निदान प्रयोग शाळा सूक्ष्म जिवशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविल होते. ५ एप्रिल रोजी पाचही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तर सहाव्या रूग्णाला अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव येथील रूग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले असता त्याचा पहीला रिपोर्ट ही निगेटिव्ह आला असून दूसरा रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे. तसेच दुसºयांदा पाचही संशयित रुग्णांना ८ एप्रिल रोजी शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब नमूने नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानला पाठविण्यात आले असता १० एप्रिल रोजी पाचही संशयित रुग्णाचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. दुसºयांदाही पाचही संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मयूर वाडे यांनी दिली आहे. दुसºयांदाही सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे. तालुक्यात सद्यास्थिती एकही रुग्ण कोरोना विषाणू बाधित नाही. तरीसुद्धा येथील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत घरातच राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहेत.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sangrampur: Five suspected patients report negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.