सातपुड्यात सागवान तस्करी; दोघांना अटक, तीन फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:10 AM2017-11-08T00:10:32+5:302017-11-08T00:11:16+5:30
जळगाव जामोद : सातपुड्यामधील जामोद-करमोडा बिटमध्ये सागवान लाकडांची तस्करी करताना दोन आरोपींना वन अधिकार्यांनी पकडले तर तीन आरोपी फरार झाल्याची घटना ६ नोव्हेंबरचे रात्री १0 वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : सातपुड्यामधील जामोद-करमोडा बिटमध्ये सागवान लाकडांची तस्करी करताना दोन आरोपींना वन अधिकार्यांनी पकडले तर तीन आरोपी फरार झाल्याची घटना ६ नोव्हेंबरचे रात्री १0 वाजता घडली. गोपनीय माहितीवरून उ पवनसंरक्षक भगत, वनपरिक्षेत्राधिकारी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जामोद बीटचे सहायक एस.जी. खान, एम.डी. गवळी आणि वनरक्षक उबरहांडे, व्ही.आर. मानकर, एस.बी. बांगरे, वाहनचालक गजानन कुटे व वनमजूर इत्यादींनी रात्री १0 वा. हेल्याडोह परिसरात सापळा रचून छापा टाकला असता पाच इसम सागवान लाकडे घेऊन जाताना पकडले. त्यातील सुरेश भावसिंग अहीर्या आणि जगदीश जोगड्या म्हसान्या दोघेही रा. वडपानी यांना अटक करण्यात वन अधिकार्यांना यश आले तर इतर तीन आरोपी रायमल खुल्या कनाशा, छगन सीताराम राऊत, जयपाल पातलसिंग भयड्या रा.वडपाणी हे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.
याप्रकरणी आरोपीकडून सागवान चौरस ५ नग 0.२१५ घनमीटर माल अंदाजे किं. ११ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला व आरोपीविरूध्द वन गुन्हा अप.क्र.६१६/१४ नुसार वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) ई.ह.फ. ४१ (२) आणि भादंविचे कलम ३४, १४९, ३३३, ४११, ४१३, ४२७ जैविक २00२ चे कलम ५६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील त पास वन अधिकारी कांबळे हे करीत आहेत. यामधील आरोपींना आज ७ नोव्हेंबर रोजी न्यायालयात दाखल केले असता, त्यांना तीन दिवसांचा एफसीआर मिळाल्याचे वन अधिकारी खान यांनी माहिती दिली.