दहावीच्या निकालाला उशीर झाल्यास शाळाच जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:24 AM2021-07-01T04:24:02+5:302021-07-01T04:24:02+5:30
बुलडाणा : काेराेनामुळे शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे, शासनाने निर्धारित केलेल्या मूल्यांकनाच्या निकषानुसार दहावीचा ...
बुलडाणा : काेराेनामुळे शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे, शासनाने निर्धारित केलेल्या मूल्यांकनाच्या निकषानुसार दहावीचा निकाल तयार करण्याचे काम शाळा स्तरावर सुरू आहे. जिल्ह्यातील ९० टक्के शाळांनी निकाल पूर्ण केला आहे.
अमरावती बाेर्डाने शाळांना निकाल सादर करण्यासाठी केंद्र निश्चित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शाळांना त्यांचा निकाल तयार करून बुलडाणा येथे २ जुलै राेजी बाेर्डाच्या प्रतिनिधींकडे सादर करावा लागणार आहे. त्यामुळे, सध्या माध्यमिक शाळांमध्ये निकालाची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात गत वर्षापासून काेराेनामुळे शाळा बंदच आहेत. त्यामुळे, नववीच्या परीक्षा घेण्यात आलेल्या नाहीत. यावर्षीही काेराेनामुळे शाळा काहीच महिने सुरू झाल्या हाेत्या. त्या आधारावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे, असा प्रश्न शिक्षकांना आहे. यावर्षी चाचण्या घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, शाळाच बंद असल्याने अशा चाचण्या घेण्यासाठी अडचण आली आहे.
इयत्ता दहावीचे निकाल शासनाकडून मिळालेल्या निर्देशानुसार तयार करण्यात येत आहे. सुरुवातीपासून या कामाला प्राधान्य दिल्याने निकाल तयार झाले आहेत.
के. एन. शिंदे, मुख्याध्यापक
मूल्यांकन करण्याविषयी काही अडचणी आल्या हाेत्या. त्यावर वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन निकाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे. आता अंतिम टप्यात निकाल आला.
सूरज माेरे, शिक्षक
निकालाचे काम अंतिम टप्यात आले
शासनाकडून आलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शाळांमध्ये इयत्ता दहावीचा निकाल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्वच शाळांचे सहकार्य मिळत असल्याने ९० टक्के शाळांचे निकाल तयार आहेत. त्यामुळे, निकाल वेळेवर लागणार आहे.
प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी माध्य.