दुसऱ्या टप्प्यात मिळाला ४८ काेटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:31 AM2021-01-13T05:31:27+5:302021-01-13T05:31:27+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात गत वर्षात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे खरीप हंगामाला जबर फटका बसला होता. ...

In the second phase, funds of 48 girls were received | दुसऱ्या टप्प्यात मिळाला ४८ काेटींचा निधी

दुसऱ्या टप्प्यात मिळाला ४८ काेटींचा निधी

Next

बुलडाणा : जिल्ह्यात गत वर्षात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे खरीप हंगामाला जबर फटका बसला होता. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाकडून जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात ४७ कोटी ७० लाख ७० हजार रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. या निधीचे आठ तालुक्यांना वितरण करण्यात आले असून, लवकरच मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

मागील जून ते ऑक्टोबर २०२० दरम्यान जिल्ह्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीने ७ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांना जबर तडाखा बसला. त्यामुळे राज्यातील आघाडी सरकारने जिल्ह्याला दाेन टप्प्यात मदत दिल. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याला सुमारे ४८ कोटींचा निधी मिळाला. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, आरडीसी दिनेश गीते यांच्या मार्गदर्शनात नैसर्गिक आपत्ती कक्षाचे नायब तहसीलदार संजय बनगाळे, त्यांचे सहकारी अनंत साळवे यांनी हा निधी ८ तालुक्यांना मागणीनुसार वितरित केला आहे.

असा मिळाला निधी

चिखली तालुका दाेन कोटी, शेगाव चार कोटी ३२ लाख, मेहकर २ कोटी, देऊळगावराजा २ कोटी १३ लाख, सिंदखेड राजा २७ कोटी, लोणार ८० लाख ४८ हजार, नांदुरा २० लाख ११ हजार, मोताळा २ लाख ३६ हजार रुपये मिळणार आहे.

Web Title: In the second phase, funds of 48 girls were received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.