बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून साेमवारी जिल्ह्यातील सात जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ तसेच उपचारादरम्यान जानेफळ ता. मेहकर ४३ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तिघांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे़ १,२२५ जणांचा काेराेना अहवाल निगेटिव्ह आला आहे़
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये खामगाव शहर १, जळगाव जामोद तालुका आसलगाव १, चिखली तालुका सावरखेड १, नायगाव १, शिंदी हराळी १, चिखली शहर १, मेहकर तालुका जानेफळ येथील एकाचा समावेश आहे़ तसेच आजपर्यंत ६ लाख १९ हजार ६६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत़
१९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू
आज रोजी १,३२९ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८७ हजार २०९ कोरोना बाधित रूग्ण असून त्यापैकी ८६ हजार ५२३ कोरोना बाधित रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे १९ सक्रिय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत ६६७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.