शेडनेट धारकांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:40 AM2021-08-14T04:40:18+5:302021-08-14T04:40:18+5:30
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व एकात्मिक फलोत्पादन व्यवस्थापन कार्यक्रमअंतर्गत शेडनेट उभारलेल्या शेतकऱ्यांसाठी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, बुलडाणाअंतर्गत तालुका ...
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व एकात्मिक फलोत्पादन व्यवस्थापन कार्यक्रमअंतर्गत शेडनेट उभारलेल्या शेतकऱ्यांसाठी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, बुलडाणाअंतर्गत तालुका भरोसा येथे बीजोत्पादन आणि भाजीपाला उत्पादन, विक्री व्यवस्थापन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून नाईक बोलत होते. उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यशाळेत अनंता सिड्स, जालनाचे कार्यकारी संचालक सुभाष धुमाळ, सीताई नॅचरल फार्मर फेडरेशनचे संचालक अभिषेक भराड यांनी व अधिकारी वर्गाने विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेला गणेश थुट्टे, लक्ष्मण खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकल्प विशेषज्ञ उमेश जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडल कृषी अधिकारी अनंता अंभोरे, कृषी पर्यवेक्षक किशोर टाले, कृषी सहायक गजानन इंगळे, प्रकल्प विशेषज्ञ सोहम बेलोकर, समूह सहायक जयदीप झोरे, प्रशांत सुरुशे, राजेश खरात यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेला शेडनेटधारक शेतकरी उपस्थित होते.