शेगाव : नाफेड केंद्रावर मोजमापात घोळ; शेतक-यांचा सोडून व्यापा-यांचा माल खरेदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 08:04 PM2017-12-14T20:04:40+5:302017-12-14T20:05:07+5:30
उडिद, मुग विक्रीसाठी आणलेल्या शेतक-यांसोबत येथील नाफेड खरेदीकेंद्रावर उद्धटपणाची वागणूक देत शेतक-यांचा सोडून व्यापा-यांचा माल खरेदी केल्याने मंगळवारी १३ डिसेंबररोजी संध्याकाळी ७.३० वाजता गोंधळ निर्माण झाला. मोजमापातही घोळ केला जात असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.
विजय मिश्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : उडिद, मुग विक्रीसाठी आणलेल्या शेतकºयांसोबत येथील नाफेड खरेदीकेंद्रावर उद्धटपणाची वागणूक देत शेतक-यांचा सोडून व्यापा-यांचा माल खरेदी केल्याने मंगळवारी १३ डिसेंबररोजी संध्याकाळी ७.३० वाजता गोंधळ निर्माण झाला. मोजमापातही घोळ केला जात असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.
मंगळवारी नाफेड केंद्रावर अनेक शेतकºयांनी उडिद, मुग विक्रीसाठी आणले. संध्याकाळ झाली तरी खरेदीचा पत्ता नव्हता. शेतकºयांची २०० ते ३०० वाहने उभी असतांना अचानक खरेदीस सुरवात झाली. मध्येच एकाचा ट्रॅक्टर आत घेण्यात आला. त्यामुळे शेतकºयांनी माहिती काढली असता तो ट्रॅक्टर व्यापा-याचा निघाला. त्यामुळे शेतकºयांनी एकच गोंधळ केला. या प्रकाराची माहिती नाफेडच्या अधिकाºयांना दिल्यानंतरही ते ऐकून घेण्यास तयार नव्हते असा आरोप शेतकºयांनी केला आहे. या प्रकाराची माहिती तहसिलदारांना मिळाल्याने त्याठिकाणी नायब तहसिलदार व पुरवठा अधिकारी व बाजार समिती सचिवाने धाव घेतली. शेतक-यांचे म्हणणे ऐकून घेतले. कुणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही शेतकºयांना मिळाल्यानंतर शेतकरी शांत झाले.
तो ट्रॅकटर श्रीराम इस्टेटचा
१३ डिसेंबर हा माल खरेदीचा शेवटचा दिवस असल्याने ही गर्दी झाली होती. याठिकाणी श्रीराम इस्टेटचे गोडावून आहे. तेथून ट्रॅक्टरमध्ये उडिदाचा माल भरण्यात आला. मध्येच शेतक-यांच्या रांगेत ट्रॅक्टर उभा करण्यात आला. त्यामुळे हा गोंधळ उडाला.
शेतक-यांचे नोंदवले बयाण
मंडळ अधिकारी आर. बी. दीक्षित, पुरवठा अधिकारी चांभारे यांनी शेतक-यांचे बयाण नोंदवले. यामध्ये सैय्यद साजिद सैय्यद साबिर (मनसगाव), विनायक देवीदास फाटे (पहुरजीरा), संतोष ताराचंद चांडक (हाता), गोपाल पांडुरंग आखरे, वि. के. कंकाळ (मनसगाव) आदी शेतक-यांचा समावेश आहे.
झालेल्या प्रकाराबाबत आम्ही निश्चित चौकशी करू. यासाठी नाफेड केंद्र प्रमुखांना सांगितले आहे. शेतकºयांची तक्रार आम्ही घेतली आहे.
- आर. बी. दीक्षित (मंडळ अधिकारी)