CoronaVirus : शेगावातील महिलेचा अकोल्यात मृत्यू; आणखी आठ पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:55 AM2020-06-22T10:55:30+5:302020-06-22T10:55:44+5:30

सरासरी दररोज चार व्यक्ती जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळून येत असल्याचे चित्र आहे.

Shegaon woman dies in Akola; Again eight positive | CoronaVirus : शेगावातील महिलेचा अकोल्यात मृत्यू; आणखी आठ पॉझिटिव्ह 

CoronaVirus : शेगावातील महिलेचा अकोल्यात मृत्यू; आणखी आठ पॉझिटिव्ह 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात गेल्या २१ दिवसात तब्बल ९१ व्यक्ती कोराना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत ५६ टक्के रुग्ण हे जून महिन्यात आढळून आले असून सरासरी दररोज चार व्यक्ती जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळून येत असल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यात १५९ कोरोना बाधीत रुग्ण असून त्यापैकी ३८ रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात येत आहेत.
दरम्यान अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी ६३ अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी ५३ अहवाल निगेटीव्ह आले असून आठ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मलकापूर येथील लक्ष्मीनगर येथील ५५ वर्षीय व्यक्ती, पातुर्डा (ता. संग्रामपूर) येथील ३७ वर्षीय महिला आणि संग्रामपूर येथील ३३ वर्षाचा पुरुष, दोन वर्षाची मुलगी आणि ३८ वर्षीय महिलेचा यात समोश आहे. शेगाव येथील जोगडी फैल भागातील चार महिन्याचे बाळही पॉझिटिव्ह असून खामगावातील एक व्यक्तीही पॉझिटिव्ह आली आहे.
दुसरीकडे मलकापूर शहरातील हाशीमनगरमधील ५५ वर्षीय व्यक्तीचा १६ जून रोजी मृत्यू झाला होता. त्याचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल रविवारी आला. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता आठ झाली आहे. या व्यतिरिक्त अकोला येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शेगाव येथील एका महिलेचाही मृत्यू झाला आहे. २० जून रोजी या महिलेचा मृत्यू झाला असून १९ जून रोजी तिला अकोला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नांदुरा तालुक्यातील वाडी येथील महिलेचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेचा पती आधीच पॉझिटिव्ह आला होता. मात्र या रुग्णांची ज्या डॉक्टरांनी तपासणी केली होती त्या डॉक्टरसह त्यांचा संपूर्ण स्टाफचा रिपोर्टही निगेटीव्ह आलेला आहे. त्यामुळे नांदुरेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.
रविवारी पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात मलकापूरमधील हेडगेवार नगररात राहणारा ३६ वर्षीय व्यक्ती, शास्त्रीनगरमधील २७ वर्षीय महिला आणि आठ महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त मलकालूप तालुक्यातील धोंगर्डी येथील ७० वर्षीय वृद्ध महिला व ६७ वर्षाच्या पुरुषानेही कोरोनावर मात केली आहे.

Web Title: Shegaon woman dies in Akola; Again eight positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.