मलकापूरात प्रहार जनशक्तीपक्षाचे 'शिट्टी बजाव'आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 04:10 PM2018-06-30T16:10:41+5:302018-06-30T16:12:12+5:30

प्रहार जनशक्ती पक्षाचेवतीने उपजिल्हाप्रमुख अजय टप, महिला आघाडीप्रमुख प्रांजली धोरण यांच्या नेतृत्वात आगळेवेगळे शिट्टी बजाव आंदोलन करण्यात आले.

The 'Shital Bajwa' movement of Manashakti-Pakha strikes meakapure | मलकापूरात प्रहार जनशक्तीपक्षाचे 'शिट्टी बजाव'आंदोलन

मलकापूरात प्रहार जनशक्तीपक्षाचे 'शिट्टी बजाव'आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देप्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अजय टप यांच्या हस्ते तहसील चौकातील देशगौरव सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी गळ्यात टाकलेल्या शिट्या वाजवत तहसील चौकातून नांदुरा रस्त्यावरुन नगरपालिके पर्यंत शिट्टी बजाव आंदोलन केले.

 

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : मलकापुरात विविध बँका, व्यापारी संकुले, सोसायट्या आदी ठिकाणच्या अनधिकृत पार्कींगमुळे रहदारीत खोडा निर्माण होत आहे. त्यामुळे अशा बांधकामांना परवानगी देणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकारी व बांधकाम अभियंत्यांवर कारवाई करावी. या मागणीवरुन प्रहार जनशक्ती पक्षाचेवतीने उपजिल्हाप्रमुख अजय टप, महिला आघाडीप्रमुख प्रांजली धोरण यांच्या नेतृत्वात आगळेवेगळे शिट्टी बजाव आंदोलन करण्यात आले.
आज शनिवारी दुपारी १२ वाजता प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अजय टप यांच्या हस्ते तहसील चौकातील देशगौरव सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी गळ्यात टाकलेल्या शिट्या वाजवत तहसील चौकातून नांदुरा रस्त्यावरुन नगरपालिके पर्यंत शिट्टी बजाव आंदोलन केले. या माध्यमातून पालिका प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी केला.
या आंदोलनात युवा तालुकाप्रमुख अमोल बावस्कार, शेषराव संबारे, शालीकराम पाटील, शहर युवाप्रमुख अर्जुन पाटील, राहुल तायडे, देविदास बोंबटकार, बळीराम बावस्कार, अजाबराव वाघ, प्रदीप पाटील, विशाल आमले, पप्पू ठाकूर, प्रमोद भिसे, ऋषिकेश निमकर्डे, सचिन बुडुकले, दीपक चंदनकार, सोपान इंगळे, वैभव राठोड, राजेंद्र निंबोळकर, नविन वाघ, विनोद बाठे, रोशनी कथणे आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सामील होते. दरम्यान आंदोलनानंतर पालिका प्रशासनास निवेदन देवून अजूनही कारवाई न झाल्यास येणाºया काळात आंदोलन तीव्र करण्याबाबत इशारा देण्यात आला.

Web Title: The 'Shital Bajwa' movement of Manashakti-Pakha strikes meakapure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.