शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

बुलडाणा जिल्ह्यात आता १३ ठिकाणी शिवभोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 12:23 PM

या १३ केंद्रावर प्रतिदिन १ हजार १०० शिवथाळींचे वाटप केले जाणार आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लॉकडाऊनमुळे बाहेरगावी अडकलेले विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर व स्थलांतरित लोकांसाठी तालुकास्तरावरही शिवभोजन सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यात आता नव्याने १३ ठिकाणी तालुकास्तरीय शिवभोजन केंद्र सुरू करण्याचे नियोजन पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे. या १३ केंद्रावर प्रतिदिन १ हजार १०० शिवथाळींचे वाटप केले जाणार आहे.आतापर्यंत जिल्हा मुख्यालयी शिवभोजन सुरू होते. बुलडाणा येथील शिवभोजन केंद्रावरून ५०० शिवथाळींचे वितरण करण्यात येत आहे. सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बाहेरगावचे विद्यार्थी, काही स्थलांतरीत लोक अडकलेले आहेत. लॉकडाऊनमुळे या नागरिकांचे जेवणाअभावी हाल होऊ नये, यासाठी तालुकास्तरावर शिवभोजन सुरू करण्यात येत आहे. रस्त्यावरील बेघर, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाहीत, यासाठी तातडीने शिवभोजन सुरू करण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून सर्व तहसीलदारांना सुचना दिल्या आहेत. जिल्ह्यात १३ तालुक्यात १३ शिवभोजन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर याठिकाणी प्रतिदिन १ हजार १०० शिवथाळ्यांचे वितरण केले जाणार आहे. यापैकी संग्रामपूर आणि बुलडाणा येथे तालुकास्तरीय शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे. इतर ठिकाणी १ एप्रिल पासून सुरू होणार आहे. त्यासाठी तहसील कार्यालयाकडून सर्व माहिती गोळा करण्यात येत आहे. भोजनालय दररोज फक्त दुपारी ११ ते ३ या वेळेत सुरू राहणार आहे.

अशी घ्यावी लागणार खबरदारीभोजनालय चालकांनी ग्राहकांना आवेष्टित स्वरूपात (पॅकेज फूड) भोजन उपलब्ध करून द्यावे, शिवभोजर तयार करण्याआधी त्या व्यक्तीने त्यांचे हात कमीत कमी २० सेकंद साबणाने धुवावेत. सर्व भांडी निर्जुंतुक करून घ्यावित. शिवभोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात तालुकास्तरीय शिवभोजन सुरू करण्याबाबत सर्व तहसीलदारांना सुचना दिल्या आहेत. दोन ठिकाणी शिवथाळींचे वाटप सुरू झाले आहे. १ एप्रिलला सर्वच ठिकाणी केंद्र सुरू होईल.- गणेश बेल्लाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाshiv bhojnalayaशिवभोजनालय