चिखली : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शहरातील पुतळ्यापासून ते राऊतवाडीपर्यंत होत असलेला सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी रस्त्याचे काम बंद पाडले. दरम्यान, याबाबत पालिकेला निवेदन देऊन रस्त्याचे काम गुणवत्तापूर्व व उच्च दर्जाचे करावे, अशी मागणी केली आहे.
राऊतवाडी बसस्थानक ते पंचायत समितीजवळील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता कामात वापरण्यात येणारे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करीत हे काम तात्काळ थांबवण्यात यावे, बांधकाम अंदाजपत्रकाचे फलक सदर ठिकाणी लावण्यात यावे व काम उच्च दर्जाचे करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी दत्ता देशमुख, मनोज वाघमारे, समाधान जाधव, बंटी कपूर, राजेश पवार, राम देशमुख, मंगेश ठेंग, बंटी लोखंडे, बबलू शेख, शंभू गाडेकर, दीपक मगर, अनिल जावरे, शेख इम्रान, साहिल काझी, सतनाम वधवा, अनिल पठ्ठे, विनोद सगरे, शुभम गंगे, धनू देशमुख, सार्थक भावसार, गोलू वराड, स्वप्नील भराड, मोहन घोलप, शेख बिलाल, आसीफ बागवान, शेख मोशीन, अक्षय खरात, गणेश जाधव, कुशल शिरभाते, पप्पू परिहार, योगेश गिरे, तसेच राऊतवाडी, वीर सावरकरनगर, माळीपुरा भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदन स्वीकारताना मुख्याधिकारी अभिजित वायकोस, कुणाल बोंद्रे उपस्थित होते.
आंदाेलनाचा इशारा
याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास खासदार प्रतापराव जाधव, सहसंपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, उपजिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख, तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, शहरप्रमुख श्रीराम झोरे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, तालुकाप्रमुख नंदू कऱ्हाडे, नगरसेवक दत्ता सुसर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा सेना शहरप्रमुख विलास घोलप यांनी दिला आहे.