देऊळगाव राजा : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख ना उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुंबई येथे शिवसेना जिल्हाप्रमुखांची आढावा बैठक घेऊन महाराष्ट्रभर शिव संपर्क मोहीम राबविण्यासाठी सर्व जिल्हाप्रमुखांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने ११ जुलै राेजी जालिंधर बुधवत शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी आमदार डॉ़ शशिकांत खेडेकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिभाऊ जाधव, उपजिल्हा प्रमुख दीपक बोरकर, शिवसेना नेते डॉ. रामप्रसाद शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत देऊळगाव राजा तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली़
यावेळी जि.प. सदस्य पती धनशीराम शिपणे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, दादाराव खार्डे, रणजित काकड, न.प. उपाध्यक्ष पवन झोरे, शहर प्रमुख मोरेश्वर मीनासे, भगवान खंदारे, गिरीश वाघमारे, अविनाश डोईफोडे, विजय देवउपाध्ये, संभाजी शिंगणे, शिवाजी कुहिरे, अजय शिवरकर, नंदन खेडेकर, दिनकर खरात, हरिभाऊ वाघ, रामेश्वर कोल्हे, बाबासाहेब मस्के, दिनकर वाघ, दीपक पवार, बद्री दंदाले, संदीप राऊत, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.
या मुद्यावर झाली चर्चा
बैठकीत पक्ष संघटन करणे, गावागावात शिवसेना शाखा स्थापन करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे, रिक्त असलेले विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांची पदे भरणे, गावागावात शिवसेना शाखेचे फलक लावणे, तसेच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे इ. विषयावर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.