धामणगाव बढे : जीएसटीच्या माध्यमातून व्यापार्यांसह सर्वसामान्यांमध्ये धडकी भरविणाऱ्या अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे वॉटरकप स्पर्धेसाठी श्रमदान केले. टॅक्सची फाईल घेऊन वावरणाऱ्या या अधिकारी वर्गाने थेट हातात कुदळ घेऊन श्रमदान केले. खामगाव येथील तरुणाई फाऊंडेशनची चमूही १४ एप्रिल रोजी सिंदखेड येथे श्रमदान करण्यासाठी सकाळी सिंदखेड येथे पोहोचली. त्यांच्या सोबत जीएसटीचे अधिकारीही होते. दरम्यान, सिंदखेड हे मोताळा तालुक्यातील गाव वॉटरकप स्पर्धेत सहभागी झालेले आहे. येथे सध्या श्रमदानाची चळवळ ही लोकचळवळ बनत आहे. त्यात मोठे अधिकारीही सहभागी होत असून श्रमदान करण्यासाठी आकर्षिल्या जात आहे. सिंदखेड येथील ग्रामस्थही सध्या झपाट्याने श्रमदान करीत आहेत. जीएसटीचे डेप्यूटी कमिशनर टी. के. पाचरणे, त्यांची पत्नी साधना आणि मुलेही तळपत्या उन्हात सिंदखेड येथे या श्रमदान सहभागी झाले. त्यांच्या सोबत महिला अधिकारी कुम्बरे, तरुणाई फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण विठोरे, राजेंद्र कोल्हे, उमाकांत कांडेकर, गोपाल पवार, अमोल तायडे, बोराडे आणि धंदर सहभागी झाले होते. दरम्यान, श्रमदान स्थळी पाण्याचे महत्त्व विषद करणारी पाण्याच्या थेंबाची मोठी रांगोळी पाणी फाऊंडेशनच्या वतीने एक एकर जागेमध्ये राजू कोल्हे यांनी काढली. श्रमदानस्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गोरोबा काका यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी गावकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रमदान बनली चळवळ सिंदखेड गाव वॉटरकप स्पर्धेत सहभागी झाले असून येथे श्रमदान ही एक चळवळ बनत आहे. श्रमदानासाठी आलेल्या आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी रात्री ग्रामपंचायतीमध्ये मुक्का केला होता. अमेरिकेला स्थायिक झालेल्या सिंदखेड येथील जितेंद्र गडाख या युवकानेही श्रमदानासाठी गावात मुक्काम वाढवला. आजारी असतानाही जिल्हा परिद सदस्य अॅड. गणेशसिंह राजपूत श्रमदानासाठी सरसावले होते तर ग्रामसेवक राजेंद्र वैराळकर हे सध्या या मोहिमेत चांगला समन्वय ठेऊन आहेत.
वॉटरकप स्पर्धेसाठी जीएसटी अधिकाऱ्यांनी परिवारासह केले श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 6:47 PM
धामणगाव बढे : जीएसटीच्या माध्यमातून व्यापार्यांसह सर्वसामान्यांमध्ये धडकी भरविणाऱ्या अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे वॉटरकप स्पर्धेसाठी श्रमदान केले. टॅक्सची फाईल घेऊन वावरणाऱ्या या अधिकारी वर्गाने थेट हातात कुदळ घेऊन श्रमदान केले. खामगाव येथील तरुणाई फाऊंडेशनची चमूही १४ एप्रिल रोजी सिंदखेड येथे श्रमदान ...
ठळक मुद्दे टॅक्सची फाईल घेऊन वावरणाऱ्या या अधिकारी वर्गाने थेट हातात कुदळ घेऊन श्रमदान केले. खामगाव येथील तरुणाई फाऊंडेशनची चमूही १४ एप्रिल रोजी सिंदखेड येथे श्रमदान करण्यासाठी सकाळी सिंदखेड येथे पोहोचली.सिंदखेड हे मोताळा तालुक्यातील गाव वॉटरकप स्पर्धेत सहभागी झालेले आहे.