अयोध्येत श्रीराम मंदिर निर्मितीशिवाय स्वस्थ बसणार नाही - शक्ती शांतानंद महर्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:05 AM2018-02-26T01:05:00+5:302018-02-26T01:05:00+5:30
चिखली : भारतात रामराज्याची पुनस्र्थापना करण्याची सुरुवात अयोध्ये तील श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारण्यापासून करायची आहे. त्यासाठी गेल्या २७ वर्षांपासून दरवर्षी रामराज्य रथयात्नेच्या माध्यमातून जनजागृती व जनसंघटन सुरू आहे. या अभियानाची सांगता मंदिर निर्मि तीनेच होईल व अयोद्धेत श्रीराम मंदिर निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार कोल्लूर (कर्नाटक) येथील मुकाम्बिका पीठाचे शक्ती शांतानंद महर्षी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : भारतात रामराज्याची पुनस्र्थापना करण्याची सुरुवात अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारण्यापासून करायची आहे. त्यासाठी गेल्या २७ वर्षांपासून दरवर्षी रामराज्य रथयात्नेच्या माध्यमातून जनजागृती व जनसंघटन सुरू आहे. या अभियानाची सांगता मंदिर निर्मि तीनेच होईल व अयोद्धेत श्रीराम मंदिर निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार कोल्लूर (कर्नाटक) येथील मुकाम्बिका पीठाचे शक्ती शांतानंद महर्षी यांनी केले.
अयोध्या ते रामेश्वरम रामराज्य रथयात्नेचे २४ फेब्रुवारी रोजी चिखलीत आगमन झाले होते. यानिमित्त आयोजीत सभेत ते बोलत होते. शक्ती शां तानंद महर्षी यांच्या निर्धाराला उपस्थितांनी एकमुखी पाठिंबा दिला. तत्पूर्वी शेगाव मार्गे चिखलीत दाखल झालेल्या रामराज्य रथयात्रेचे श्री खटकेश्वर महाराज संस्थानमध्ये रथयात्नेचे उत्साहात स्वागत झाले. तेथून चौफुली - बसस्थानक - शिवाजी चौक - जयस्तंभ चौक - सिमेंट रोड - चिंच परिसर मार्गे रथयात्ना श्रीराम मंदिर (रामदासी) येथे पोहोचली. मार्गात जागोजागी स्वागत कमानी, सडा, रांगोळ्या, पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी करून नागरिकांनी रथयात्नेचे स्वागत केले. जयस्तंभ चौकात युवा प्रतिष्ठानने पुष्पवृष्टी केली, तर चिंच परिसरात गजानन महाराज सेवा समितीच्यावतीने पताका, तोरणे लावून, मशाली पेटवून व दिव्यांची आरास करून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. रथयात्नेच्या मार्गात अनेकांनी पाणी वाटप केले. ‘आम्ही चिखलीकर’ ढोल-ताशा प थक व रामनामाच्या जयघोषांनी आसमंत निनादून गेला होता. श्रीराम मंदिरासमोर महाआरती पार पडल्यानंतर आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात जाहीर सभा झाली. त्यावेळी शक्ती शांतानंद महर्षी, परागबुवा रामदासी, प्रभाकरबुवा रामदासी, अरुणानंद महाराज आणि लंके महाराज उपस्थित होते. गजानन हिंगे, हरिहर सोळंके, मंगेश देशमुख, शंकर देशमुख, रवी महाजन, शशिकांत शेडगे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुधीर लंके व प्रा. प्रमोद देशपांडे तर आभार परागबुवा रामदासी यांनी मानले.