एका वृत्तवाहिनीकडून कोविड-१९ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्यजित अर्बन क्रेडिट सोसायटीचे संचालक डॉ. अनिलकुमार गाभणे यांचा सपत्निक सत्कार तसेच सत्यजीत अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने रु. १५१ कोटीच्या ठेवीच्या वरच्या गटात महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अंतर्गत प्राप्त प्रथम क्रमांक दीपस्तंभ पुरस्कार वितरण सोहळ्याच्या सत्यजित परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शनिवारी गजानन महाराज सेवा समितीच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. शिंगणे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती डॉ. अनिलकुमार गाभणे, रेखा गाभणे,म. कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, आ. अमित झनक, सुदेश लोढे, रा. कॉं. चे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, काँग्रेस नेते ॲड. अनंत वानखेडे, वामनराव झोरे, भास्करराव काळे, शहरप्रमुख कलिम खान, विलासराव चनखोरे, वसंतराव देशमुख, भीमशक्तीचे कैलास सुखदाने, शांतीलालजी गुगलिया, केशवराव फुके, सुरेश मुंदडा, बाळासाहेब सावजी, डा.सुजित महाजन, सागर उमाळर, यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी श्याम उमाळकर म्हणाले, कितीही संकट आले तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल केल्यास संकटावर मात करता येते. कर्मयोगी शिवशंकर पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गरजूंना अन्नधान्य, मजुरांना स्थलांतरासाठी प्रवासाची व्यवस्था, अधिकारी-कर्मचारी यांना सॅनिटायझर व मास्कचे वितरण करुन प्रशासनाच्या नियमावलीचे पालन करण्याबाबत प्रचार-प्रसिद्धी करुन सामाजिक दायित्व पार पाडले. प्रास्ताविक सुदेश लोढे यांनी केले. संचालन भूषणभय्या देशमुख यांनी केले. आभार घन:श्याम जोशी यांनी मानले.
गुणवंताचा सत्कार
उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, पोलीस उपविभागिय अधिकारी विलास यामावार, तहसीलदार डॉ. संजय गरकल, वैद्यकीय अधिकारी डॉ. ठोंबरे, पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, मुख्याधिकारी सचिन गाडे, राजकुमार खडसे, राजेंद्र बोंडगे यांचा कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दिवंगत शिवशंकर पाटील, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, ॲड. शैलैश देशमुख, डॉ. प्रल्हाद खडसे यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.