लोकमत न्यूज नेटवर्क सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : राजमाता जिजाऊ यांचा ४२३ वा जन्मोत्सव सोहळा मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील जिजाऊ राजवाड्यात साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मंगळवारी सकाळी सहा वाजता सूर्योदयसमयी पूजन करण्यात आले.
पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सपत्नीक जिजाऊंचे पूजन केले. मराठा सेवासंघाच्या वतीने पदाधिकारी, जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राजवाडा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजेसाठी उघडण्यात आला. जिजाऊसृष्टीवर कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली होती.
कोरोना योद्धे हेच खरे देवादीदेव : पुरुषोत्तम खेडेकर कोरोना कालावधीत सर्व प्रार्थनास्थळे बंद होती. देवही कुलूपबंद होता. मात्र, डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याने रुग्णांची सेवा केली. त्यामुळेच तेच खरे देवादीदेव होत, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे केले.
टोपे यांना मराठा विश्व भूषण पुरस्कार प्रदान n आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मराठा विश्व भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. n लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत सूर्यवंशी यांना मराठा समाज भूषण पुरस्कार, आयएएस प्रांजल पाटील यांना जिजाऊ पुरस्कार, शिवशाहीर रामदास कुरंगल यांना सम्राट शाहीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.