लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : मुलींची छेडछाड व अत्याचाराचे प्रमाण पाहता मुलींना स्वसंरक्षण करता यावे, स्वावलंबी व्हावे व तंत्नज्ञानाच्या या युगात त्यांनी आत्मनिर्भर असणे ही महत्त्वाची बाब असल्याने भारतीय जैन संघटनेद्वारे राबविल्या जाणार्या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हय़ात ‘स्मार्ट गर्ल’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी केले.भारतीय जैन संघटनेच्यावतीने देशभरात मुलींना स्वसंरक्षण व आत्मनिर्भर बनविण्याठी ‘स्मार्ट गर्ल’ या उपक्रमांतर्गत कार्यशाळेद्वारे शालेय व महाविद्यालयीन मुलींना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येते. यांतर्गत स्थानिक o्री शिवाजी विद्यालयात भारतीय जैन संघटना व जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हय़ातील पहिली कार्यशाळा २३ नोव्हेंबर रोजी पार पडली. o्री शिवाजी शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीतील १00 मुलींना या दोन दिवसीय कार्यशाळेत स्वसंरक्षण व आत्मनिर्भतेचे धडे देण्यात आले, तसेच मुलींना भेडसावणार्या विविध समस्यांबाबत या कार्यशाळेत भारतीय जैन संघटनेचे प्रमुख प्रफुल्लकुमार पारख, रेड्डी, माधुरी नलावडे, एम.पी. चौथे, राऊत, जाधव यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला शिक्षणाधिकारी डॉ.पानझाडे, तहसीलदार मनीष गायकवाड, प्राचार्य बी.एस. बारोटे, प्राचार्य डॉ.पी.एस. वायाळ, प्राचार्य डॉ.आंभोरे, मधुकर पाटील, प्राचार्य डी.जे.पवार, पर्यवेक्षक भुतेकर, खंडागळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
बुलडाणा जिल्हय़ात ‘स्मार्ट गर्ल’ उपक्रम राबविणार - पुलकुंडवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 1:45 AM
मुलींना स्वसंरक्षण करता यावे, स्वावलंबी व्हावे व तंत्नज्ञानाच्या या युगात त्यांनी आत्मनिर्भर असणे ही महत्त्वाची बाब असल्याने भारतीय जैन संघटनेद्वारे राबविल्या जाणार्या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हय़ात ‘स्मार्ट गर्ल’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी केले.
ठळक मुद्देभारतीय जैन संघटनेच्यावतीने राबविला जाणार ‘स्मार्ट गर्ल’ उपक्रम