बुलडाणा जिल्हा परिषदेचे विद्यार्थी गिरवीणार ‘स्मार्ट लर्निंग डिजीटल पेन’ ने धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 06:30 PM2017-12-17T18:30:33+5:302017-12-17T18:31:17+5:30

बुलडाणा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी स्वखर्चाने विविध उपक्रम राबविणाºया सिंदखेडच्या सरपंच विमा कदम यांनी स्मार्ट लर्निंग डिजीटल पेन बुक संच उपलब्ध करुन दिला. त्याद्वारे वर्ग एक व दोनचे विद्यार्थी बेसिक इंग्रजीचे धडे गिरविणार आहे.

'Smart Learning Digital Pen' lessons from students of Buldhana Zilla Parishad | बुलडाणा जिल्हा परिषदेचे विद्यार्थी गिरवीणार ‘स्मार्ट लर्निंग डिजीटल पेन’ ने धडे

बुलडाणा जिल्हा परिषदेचे विद्यार्थी गिरवीणार ‘स्मार्ट लर्निंग डिजीटल पेन’ ने धडे

Next
ठळक मुद्देसिंदखेड सरपंचाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणणगांव बढे (बुलडाणा): जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी स्वखर्चाने विविध उपक्रम राबविणाºया सिंदखेडच्या सरपंच विमा कदम यांनी स्मार्ट लर्निंग डिजीटल पेन बुक संच उपलब्ध करुन दिला. त्याद्वारे वर्ग एक व दोनचे विद्यार्थी बेसिक इंग्रजीचे धडे गिरविणार आहे. २० डिजीटल बुक तथा त्यासोबत डिजिटल पेन असा किटचा संच असून वापरण्यास अत्यंत सोपा व नाविण्यपूर्ण संच असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
डिजीटल पुस्तकातील अक्षरावर डिजिटल पेज ठेवल्यानंतर त्या अक्षराचा उच्चार निघतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाविण्य पूर्ण शिक्षणामुळे आवड निर्माण होते. १७ डिसेंबर रोजी सरपंच विमल कदम यांनी हा डिजिटल पेन बुक संच सिंदखेड येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिला. यापूर्वी शाळेसाठी ई लर्निंग संच सामाजिक आशय लिहिलेल्या स्कुल बॅग सरपंच कदम यांनी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी मैदान, बगीचा असे उपक्रम राबवून शाळा स्वच्छ व सुंदर केली आहे. तर डिजिटल किटच्या सहाय्याने इंग्रजी, हिंदी, मराठी, गणित विषयाचे संपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच विद्यार्थी आवडीने स्वयंअध्यन करु शकतात. खेळत खेळत शिक्षण यातून साध्य होईल अशी माहिती शिक्षक सचिन शेट्टी यांनी दिली. तर  सरपंच व गावकºयांच्या प्रयत्नातून ही शाळा आय.एस.ओ.नामांकन प्राप्त आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व संधी उपलब्ध व्हाव्यात हा या मागचा उद्देश आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल स्मार्ट पेन बुकच्या माध्यमातून कठीण विषय सोपे वाटतिल व त्यांना शाळेची ओढ निर्माण होईल.
- विमल कदम, सरपंच सिंदखेड ता.मोताळा

Web Title: 'Smart Learning Digital Pen' lessons from students of Buldhana Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.