सोयाबीनला बाजारात आठ ते दहा हजारांपर्यंत भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:38 AM2021-09-21T04:38:14+5:302021-09-21T04:38:14+5:30
गत दहा वर्षांपासून सोयाबीन या खरीप पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. साेयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. सिंदखेडराजा तालुका ...
गत दहा वर्षांपासून सोयाबीन या खरीप पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. साेयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. सिंदखेडराजा तालुका या अगोदर कपाशीचा पट्टा म्हणून ओळखला जात असे, परंतु कपाशीची जागा आता सोयाबीन या पिकाने घेतलेली असून हा तालुका आता सोयाबीन पट्टा म्हणून ओळख निर्माण झाली आहे. जवळपास ८० टक्के क्षेत्रात सोयाबीन पीक घेतले जाते. याच सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण असते, असे असले तरी हवामानाची अनुकूलता, रोगाचा प्रादुर्भाव, पेरणी ते काढणी दरम्यान लाभलेल्या वरुणराजाची साथ आदींवर हे पीक अवलंबून असते. त्यामुळे सध्या मिळत असलेल्या भावाचा लाभ मिळेल किंवा नाही, याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव जाहीर करावा
सोयाबीन पिकाचे उत्पादन गेल्या दहा वर्षांपासून घेत आहे़ पण सध्याचे भाव कायम राहील का नाही याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही़ शासनाने उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव जाहीर करावा़
तात्यासाहेब डोंगरदिवे, शेतकरी राहेरी बु.
मध्यंतरी सोयाबीन पिकाला चांगल्या प्रकारे तेजी होती. यामध्ये केंद्राच्या आयातीच्या निर्णयानंतर काही प्रमाणात घसरण झाली, असे असले तरी दर वाढले होते़ तेव्हा शेतकऱ्यांकडे माल नव्हता़ शेतकऱ्यांकडे माल आल्यावर भाव कमी होतो. अशावेळेस शेतकऱ्यांनी पण टप्प्या -टप्प्याने माल विक्रीसाठी काढला पाहिजे़
राम देशमुख, ताडशिवणी, शेतकरी.