लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मृग नक्षत्र अवघ्या तीन दिवसांवर आले आहे. जिल्ह्यात झालेल्या एक ते दोन पावसामुळे सध्या खरीप हंगामातील पेरणीपूर्व कामांनीही आता वेग घेतला आहे.यंदा सात लाख ३५ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन आहे. ७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरूवात होते. मृग नक्षत्रात खरीप पेरणी झाली, तर येणाऱ्या उत्पादनातही चांगली वाढ होते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा भर हा मृग नक्षत्रातील पेरणीवरच असतो, परंतु पावसाने साथ दिली तर. यंदा पाऊस लवकर येण्याचे चिन्ह दिसून येत असल्याने मृग नक्षत्रात पेरणी होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. आता शेतकरी कोरोनाच्या या संकटाला बाजूला सारून पेरणीपूर्व कामांना लागले आहे.
१.६५ लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूरमागील महिन्यात खताच्या दरवाढीवरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांसह प्रशासनाचेही खत विक्रीकडे लक्ष लागलेले आहे. जिल्ह्यासाठी खरीप हंगामाकरिता १ लक्ष ६५ हजार १६० मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले आहे.
काय म्हणतात शेतकरी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पेरणीपूर्व कामांना आता वेग आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. - प्रशांत कानोडजे