स्टेट बँक ग्राहकांची वाहने रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:24 AM2021-06-18T04:24:36+5:302021-06-18T04:24:36+5:30

पाणंद रस्ते झाले चिखलमय लोणार : तालुक्यातील अनेक शिवारांत धुऱ्यालगत असलेल्या शिव व पांदण रस्त्यावर परिसरातील शेतकऱ्यांनी अतिक्रमण ...

State Bank customer vehicles on the road | स्टेट बँक ग्राहकांची वाहने रस्त्यावर

स्टेट बँक ग्राहकांची वाहने रस्त्यावर

Next

पाणंद रस्ते झाले चिखलमय

लोणार : तालुक्यातील अनेक शिवारांत धुऱ्यालगत असलेल्या शिव व पांदण रस्त्यावर परिसरातील शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. तर, काही पाणंद रस्त्यांची कामे न झाल्याने पहिल्याच पावसात पाणंद रस्ते चिखलमय झाले आहे.

पावसाळ्यातच आठवतात प्रवासी निवारे

बिबी : वर्षभर प्रवासी निवाऱ्यांची दुर्दशा झालेली असते. त्यांच्या डागडुजीकडेही लक्ष दिले जात नाही. पावसाळा येताच प्रवासी निवारे आठवतात. काही प्रवासी निवाऱ्यांची मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पडझड झाली आहे.

विद्युतग्राहकांना अवाजवी विद्युतबिले

देऊळगाव राजा : तालुक्यात महावितरणकडून घरगुती विद्युतमीटरचे रीडिंग न घेताच ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले देण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

सरोवर रोडवर अस्ताव्यस्त वाहने

लाेणार : शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी लहानमोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन शहरात वाहन पार्किंग झोन उभारण्याची मागणी होत आहे. सराेवर राेडवर नेहमी वाहने अस्ताव्यस्त उभी केलेली दिसून येतात.

पाणीतपासणीच नाही

लोणार : विनापरवानगी सुरू असलेल्या बहुतांश आरओ प्लांटच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणीच हाेत नसल्याचे चित्र आहे. पाणी तपासणारी यंत्रणाच नसल्याने तसेच नगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासन या आरओ प्लांटकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे.

बियाणे न उगवलेल्यांना मदतीची प्रतीक्षाच

किनगाव राजा : मागील वर्षी खरीप हंगामात काही शेतकऱ्यांचे साेयाबीन बियाणे उगवलेच नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या हाेत्या. त्यावर पंचनामेही झाले आहेत. मात्र, त्यांना मदतच मिळाली नाही. त्यामुळे यंदा शेतकरी सावधगिरीची भूमिका बाळगत आहे.

व्हायरल फिव्हरची साथ

किनगाव राजा : परिसरात वातावरणातील बदलामुळे व्हायरल फिव्हरची साथ सुरू आहे. अनेकांना सर्दी, ताप, खाेकल्याचा त्रास हाेत आहे. काेराेनाची हीच लक्षणे असल्याने ग्रामस्थांनी धास्ती घेतल्याचे चित्र किनगाव राजा परिसरातील अनेक गावांमध्ये आहे.

सॅनिटायझर, ऑक्सिमीटरचा पुरवठा करा!

बुलडाणा : शासनाने जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर म्हणजेच कोविड चाचणी करणे आवश्यक आहे. तसेच शाळांना मास्क, स्कॅनर, ऑक्सिमीटर आणि सॅनिटायझरचा पुरवठा शासनाने करावा, अशी मागणी शिक्षक संघटनांमधून होत आहे.

लांब पल्ल्यांच्या बसेसचा अभाव

साखरखेर्डा : येथील प्रवाशांना लांब पल्ल्यांच्या बसेसचा अभाव आहे. मेहकर आगाराने बसफेरीमध्ये बदल केल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. पूर्वीप्रमाणेच त्या बसेस धावतील, याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

जनधनचे अनुदान रखडले

बुलडाणा : गेल्या काही महिन्यांपासून जनधन योजनेचे अनुदान रखडले आहे. लॉकडाऊन काळात केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेेेंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात प्रतिमहा ५०० रुपये सानुग्रह अनुदान जमा केले होते. परंतु, काही लाभार्थ्यांना ही रक्कम मिळाली नाही.

अनुदान लाटले, शौचालये नाममात्रच

बुलडाणा : घरी शौचालय असताना ग्रामीण भागात बहुतांश नागरिक उघड्यावरच शौचास जातात. घरचे शौचालय वापरत नाही, ते पडून आहे. घरी शौचालय असताना ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात असल्याने एकप्रकारे आरोग्य धोक्यात येत आहे.

हरभरानोंदणीचा आज अंतिम दिवस

बुलडाणा : शासकीय हमीभावाने हरभरा खरेदी करण्यात येत आहे. हरभरा विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. १८ जूनपर्यंत शेतकऱ्यांना हरभरानोंदणी करता येणार आहे.

Web Title: State Bank customer vehicles on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.