खामगाव: भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात सध्या देशभरात वातावरण ढवळून निघ त आहे. काँग्रेसने या कायद्याविरोधात किसान रॅली काढली, तर भाजपा सर्मथक हा कायदा विकासासाठी व शेतकर्यांसाठी किती पोषक आहे, हे पटवून सांगत आहेत. या पृष्ठभूमीवर खामगाव शहरातील प्रातिनिधिक स्वरूपात विधिज्ञ तसेच शे तकर्यांची भूमिका लोकमत ने जाणून घेतली असता या कायद्याबाबत व्यापक जनजागृती होऊन खरे स्वरूप लोकांसमोर येणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकर्यांच्या जमिनी त्यांना न विचारता अधिग्रहित होतील. जमिनीचा भाव ठरविण्याचा अधिकारही सरकारला प्राप्त होईल, अशी प्रमुख भीती शेतकर्यांमध्ये आहे. काही विधिज्ञांनी या संदर्भात सरकारने स्पष्टता दाखवावी, असे मत व्यक्त केले तर काही विधिज्ञांच्या मते जुन्या कायद्यापेक्षा हा नवा कायदा शेतकर्यांना अधिक आर्थिक फायदा करून देणारा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. जमीन ही शे तकर्यांसाठी सर्वात महत्त्वाची बाब असल्याने या संदर्भात शेतकर्यांना विश्वासात घेऊनच कायदा तयार झाला पाहिजे ही भूमिका कोणीही नाकारली नाही त्यामुळे विश्वासार्हता मिळविण्यासाठी कायद्याचे खरे स्वरूप स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे दिसत आहे.
भूमी अधिग्रहण कायद्याबाबत अजूनही संभ्रम!
By admin | Published: April 20, 2015 10:36 PM