Sting Operation : प्रमाणीकरणानंतरही एफसीआयच्या भुई काट्यावरील ‘तूट’कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 03:25 PM2020-05-30T15:25:34+5:302020-05-30T15:28:31+5:30
एकाच ट्रकच्या वजनात दोन काट्यावर तब्बल क्विंटलची तफावत
Next
- निल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील भारतीय खाद्य निगम (एफसीआय)च्या गोदामावरील भुईकाट्याच्या प्रमाणीकरणानंतर देखील वजनात तफावत आढळून येत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे गत दहा दिवसांपूर्वीच प्रमाणीकरण करण्यात आलेला ‘इलेक्ट्रानिक्स भुईकाटा’ संशयाच्या भोवºयात सापडला आहे. गुरूवारी गोदामावर गत पाच दिवसांपासून उभे असलेल्या ट्रकचे गोदामावरील ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक काट्यावर वजन केले. त्यावेळी संशय बळावल्याने ट्रक चालकांनी शहरातील एका खासगी भुईकाट्यावर वजन करण्यात आले. त्यावेळी खासगी भुईकाट्यावर प्रत्येक ट्रकमागे ९०, ९५ ते एक क्ंिवटलपर्यंत वजन वाढल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले.खामगाव (टेंभूर्णा) येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामावर धान्य मोजून देण्यासाठी ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक प्रा.लि.शी करार करण्यात आला आहे. दरम्यान, ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक च्या भुईकाट्यावरील वजनात तफावत आढळून येत असल्याच्या तक्रारीनंतर भारतीय वैद्यमापन शास्त्र विभागाकडून २९ एप्रिल रोजी तपासणी करण्यात आली. त्यावेळी काट्यात फेरफार आढळून आल्याने काटा जप्त करण्यात आला. ब्लॅकस्टोन लॉजीस्टिक कंपनीने गुन्हा मान्य केल्यानंतर त्यांना २८ हजाराचा दंड ठोठावण्यात आला. कंपनीने दंडाचा भरणा केल्यानंतर १५ मे रोजी या वजन काट्याचे प्रमाणीकरण करण्यासाठी अधिकारी तेथे धडकले. मात्र, काट्यावर वजनांचा अभाव असल्याने अखेरीस २१ मे रोजी या काट्याचे प्रमाणीकरण करण्यात आले. मात्र, प्रमाणीकरण करण्यात आल्यानंतर देखील एफसीआयच्या गोदामावरील ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक प्रा.लि.च्या काट्यावरील वजनात तब्बल १ क्विंटलपर्यंत तफावत आढळून आली. त्यामुळे या काट्याच्या प्रमाणीकरणाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान, याप्रकाराबाबत भारतीय वैद्यमापन शास्त्र विभाग, भारतीय खाद्य निगम वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. भारतीय खाद्य निगमच्या एका बड्या अधिकाºयाने या सर्वप्रकाराबाबत कानावर हात ठेवले.चौकट....असे करण्यात आले स्टिंग आॅपरेशन!केंद्र शासन आणि एफसीआयच्या संयुक्त विद्यमाने खामगाव येथे पाठविण्यात आलेल्या धान्याची गोदामावर पाचदिवसांपासून अडवणूक करण्यात येत असल्याची माहिती ‘लोकमत’ला प्राप्त झाली. या माहितीची शहनिशा करण्यासाठी ‘लोकमत’प्रतिनिधीने गोदामावर धडक दिली. त्यावेळी ट्रक चालकांनी आपबिती कथन केल्यानंतर काट्यावरील वजनाच्या फेरफारीबद्दल त्यांना ‘लोकमत’ प्रतिनिधी सांगितले. त्यावेळी गोदामावर उभ्या असलेल्या ट्रकचे सुरूवातीला ब्लॅक स्टोन लॉजीस्टिकच्या भुईकाट्यावर वजन केले. संशय बळावल्यानंतर ट्रक खाली न करताच दुसºया काट्यावर एका खासगी काट्यावर ट्रकचे वजन केले असता, प्रत्येक ट्रकमागे सरासरी ९० किलो ते एक क्विंटलपर्यंत तफावत आढळून आली.चौकट...कोरोना संचारबंदी काळात धान्याची अफरातफर!एफसीआयच्या खामगाव(टेंभूर्णा) येथील भुईकाट्यावर वजनात फेरफार करून मोठा घोळ केल्या जात आहे. वैद्यमापन शास्त्र विभागानेही येथील पोलखोल उघडकीस आणली आहे. ऐन कोरोनासंचारबंदी काळात येणाºया धान्यांची मोठ्याप्रमाणात अफरातफर होत आहे. मात्र, याकडे राज्यातील एका बड्या राजकारण्याच्या वरदहस्तामुळे एफसीआय, खामगाव येथील महसूल विभाग आणि भारतीय वैद्यमापन शास्त्र विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.