खदानमध्ये बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 06:19 PM2019-07-14T18:19:22+5:302019-07-14T18:19:30+5:30

खामगाव : येथील चांदमारी भागातील रहिवाशी सैय्यद सलीम याचा शेलोडी येथील खदानमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना १४ जुलैरोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.

Student Drowning in the mine | खदानमध्ये बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू 

खदानमध्ये बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू 

Next


खामगाव : येथील चांदमारी भागातील रहिवाशी सैय्यद सलीम याचा शेलोडी येथील खदानमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना १४ जुलैरोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. चांदमारी येथील सैय्यद इशाक सैय्यद सलीम (वय १७) हा मुलगा शेलोडी भागातील खदानमध्ये तरंगतांना काही मुलांना दिसला. तेव्हा परिसरातील मुले धावत आली. त्यांनी आरडाओरड सुरु केली. तेव्हा नईम शेख आजम व त्यांच्या मित्रांनी खदानवर पोहचून मुलाला बोहर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास बाहेर काढण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे लक्षात आले. 
यापूर्वी सुद्धा शहरातील दोन ठिकाणी खदानमध्ये ४ मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  गत वर्षी अशाचप्रकारे सजनपूरी भागातील ऋषीसंकूलाजवळील एका मोठ्या खड्यात एकाचा व सुटाळा येथील नाल्यात बुडून दोघांचा अशा तीन जणांचा मृत्यू झाला होता. शहर व गावाजवळील खुले तलाव, शेततळे, खदानीमध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटनात वाढ होत आहे. वारंवार घटनांची पुर्नरावृत्ती होत असताना प्रशासनाकडून मात्र कोणतीही दखल घेतल्या जात नाही हे विशेष.

Web Title: Student Drowning in the mine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.