विद्यार्थ्यांना आहाराऐवजी मिळणार थेट तांदूळ व दाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:46 PM2020-03-31T17:46:42+5:302020-03-31T17:46:46+5:30
पहिली ते पाचवी पर्यंत ९ हजार ५१४ तर सहावी ते आठवी पर्यंत ५ हजार ३३१ विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे तांदूळ, डाळ, कडधान्य समप्रमाणात वाटप करण्यात येणार आहे.
Next
ल कमत न्यूज नेटवर्क संग्रामपुर : कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. यादरम्यान विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळाले नसल्याने बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण संचालकांनी ३० मार्च रोजी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराऐवजी थेट धान्य वाटप करण्याचे आदेश दिले आहे. जिल्हा परिषदेने ३० मार्च रोजी या संदभार्तील आदेश पंचायत समिती व प्रत्येक शाळेत दिले आहे. ३१ मार्च रोजी सकाळी ७ ते ११ दरम्यान पोषण आहारातील तांदूळ व दाळ वाटपासाठी तालुक्यातील सर्व शाळांवर शालेय शिक्षण समितीची पुर्वनियोजित बैठक पार पडली. शिक्षण विभागाच्या या आदेशाने तालुक्यातील १२१ शाळांमधील १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. दि. १ ते ३ एप्रिल पर्यंत सकाळी ७ ते ११ या वेळेत शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकांना बोलावून वाटप करण्यात येणार आहे. २५ विद्यार्थ्यांना १ मिटर अंतरावर उभे करून पोषण आहाराचे धान्य वाटप करण्यात येणार आहे. संग्रामपूर तालुक्यात पहिली ते पाचवी पर्यंत ९ हजार ५१४ तर सहावी ते आठवी पर्यंत ५ हजार ३३१ विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे तांदूळ, डाळ, कडधान्य समप्रमाणात वाटप करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाने कोरोना विषाणू संसर्गा पादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू केली. त्यामुळे आदिवासी गोरगरीब शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. संचारबंदी दरम्यान शाळा बंद ठेवण्याचे आदेश असल्याने शालेय पोषण आहाराचा मुद्दाही ऐरणीवर आला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाचा पालकांनी स्वागत केले आहे. शाळेमधून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे धान्य वाटपाची प्रक्रिया आज बुधवारी रोजीपासून सुरू होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)