लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: स्त्री शक्तीचे कार्य, कर्तृत्व अतुलनीय आहे. स्त्री शक्ती म्हणजे स्त्रीत्व आणि अस्तित्व जपणारा एक प्रवाह मानल्या जातो. या प्रवाहात अनेकींना दिशा सापडली आहे. सामान्य ते असामान्य अशा प्रवाहात कार्यरत स्त्रियांची दखल घ्यावी आणि त्यांना त्यांचे स्थान, सन्मान आणि अभिमान याची जाणीव करून द्यावी. या अनुषंगाने सखींच्या कर्तृत्वाला स त्काररूपी सलाम करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कर्तृत्वात त्यांच्यापेक्षाही कांकणभर सरस ठरणार्या महिलांचा गौरव करणारा हा सोहळा खास महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या कानाकोपर्यातल्या ध्येयवेड्या सेवाव्र तींचा सन्मान करून त्यांना मानाचा मुजरा करण्याचे ‘लोकमत’ने ठरविले आहे. सामाजिक, शौर्य, क्रीडा, आरोग्य, शैक्षणिक, व्यावसायिक-औद्योगिक, सांस्कृतिक साहित्यिक, जीवन गौरव या प्रकारामध्ये पुरस्कार दिले जाणार असून, यापैकी कुठल्याही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या इच्छुक महिलांनी त्यांची सं पूर्ण माहिती असणार्या फाइलसह अर्ज छायाचित्रासह लोकम तच्या कार्यालयात १३ नोव्हेंबरपर्यंत जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तज्ज्ञ परीक्षकांनी निवडलेल्या महिलांचा एक शानदार समारंभात गौरव करण्यात येणार आहे.
संपर्क कराया सन्मानासाठी इच्छुक सखींनी लोकमत शहर कार्यालय, चोपडे लेआउट, संग्राम चौक, बस स्टँडजवळ, बुलडाणा येथे संपर्क साधावा. अधिक माहितीकरिता ७0३८७५५८३0 या क्रमांकावर संपर्क साधावा. बुलडाणा विभागातील ध्येयवेड्या सेवाव्रती महिलांना हा पुरस्कार देण्यात येणार असून, अशा उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांनी मोठय़ा संख्येने अर्ज करावेत, असे आवाहन सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे.