चालक-वाहकांच्या मुक्कामांच्या ठिकाणांचे सर्वेक्षण प्रलंबित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 05:55 PM2018-08-18T17:55:47+5:302018-08-18T17:56:20+5:30
खामगाव : राज्य परिवहन महामंडळाची बस मुक्कामी थांबते त्या गावातील सर्वेक्षण प्रलंबित असल्याची वस्तुस्थिती असून, मुक्कामाची सोय नसल्याने, कधीकाळी खेड्यापाडयात मुक्कामी थांबणाºया बसेसच्या संख्येत आता घट झाली आहे.
-अनिल गवई
खामगाव : राज्य परिवहन महामंडळाची बस मुक्कामी थांबते त्या गावातील सर्वेक्षण प्रलंबित असल्याची वस्तुस्थिती असून, मुक्कामाची सोय नसल्याने, कधीकाळी खेड्यापाडयात मुक्कामी थांबणाºया बसेसच्या संख्येत आता घट झाली आहे. आगार प्रमुखांनी सर्व्हेक्षण करून तसा अहवाल न पाठविल्याने ही वेळी आली आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नात घट झाल्याचे दिसून येते.
पुर्वी खेड्यापाड्यात एसटी बस मुक्कामी जात होत्या. त्यामुळे एसटीचे उत्पन्न वाढत होते. परंतु आजकाल मुक्कामी एसटी बसवर चालक वाहक जाण्यास तयार नाहीत. पुर्वी मुक्कामी एसटीबसवर त्याच गावातील चालक, वाहकांची ड्युटी लावण्यात येत होती. त्यामुळे साहाजीकच मुक्कामाला घरी जाण्यास मिळते, या आशेपोटी चालक, वाहक मुक्कामी बसफेºयांवर जाणे पसंत करत होते. कालांतराने ही बाब विचारात न घेता चालक, वाहकांच्या ड्युट्या लावण्यात आल्या. यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. चालक, वाहकांच्या झोपण्याची तसेच खाण्याची व्यवस्था होत नव्हती. त्यामुळे मुक्कामी बसवर जाण्यास चालक व वाहक नाराजी व्यक्त करत होते. अशातच चालक, वाहकांच्या सुरक्षेबाबत सर्व्हेक्षण करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठविण्याच्या सुचना आगार प्रमुखांना देण्यात आल्या होत्या. परंतु आगार प्रमुखांनी याबाबत सर्व्हेक्षण केले नाही तसेच अहवालही वरिष्ठांना पाठविला नाही. यामुळे मुक्कामी बसेसवर जाणाºया चालक, वाहकांना सोयीसुविधा मिळाल्या नाहीत. यामुळे चालक व वाहक मुक्कामी बसवर जाण्यास तयार होत नव्हते. याचाच परिणाम म्हणून सध्या खेड्यापाड्यात मुक्कामी जाणाºया बसची संख्या घटली असून याचा फटका एसटी महामंडळास बसला असल्याचे एसटीतील एका अधिकाºयाने सांगितले.
सर्वेक्षण अहवालाला खो!
पश्चिम विदर्भातील अकोला-बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यात एसटी महामंडळाची १६ आगारे आहेत. यामध्ये सर्वाधिक ७ आगार बुलडाणा जिल्ह्यात आहेत. अकोला जिल्ह्यात ५ तर वाशिम जिल्ह्यात ४ आगार आहेत. यापैकी बहुतांश आगार प्रमुखांनी चालक-वाहकांच्या मुक्कामाच्या ठिकाणांचे सर्वेक्षण आणि त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयामध्ये सादर केला नसल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. अकोला, वाशिमच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यातील आगारांची अतिशय सुमार कामगिरी असल्याचाही सुत्रांचा दावा आहे.