तालुक्यातील भोसा येथील धनराज भिकाजी हांडे (२८) हा तरुण १८ ऑगस्ट रोजी भोसा येथून बहिणीच्या घरून (वागदेव) बैलजोडी आणण्यासाठी जात असता वागदेव द्रुगबोरीच्या मधात उतावळी नदीला आलेल्या पुरातून जाताना वाहून गेला. २० ऑगस्ट रोजी त्याचा मृतदेह सापडला. रविवारी आमदार रायमुलकर यांनी हांडे परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी तलाठी पांडुरंग म्हस्केंबद्दल गावकऱ्यांनी नाराजी दाखविली. तलाठी म्हस्के हे वाशिमला राहतात. महिना-महिना येत नाहीत. ही घटना घडल्यानंतरसुद्धा भेटायला आले नाही. यावर आमदार संजय रायमुलकर यांनी तत्काळ जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याशी संपर्क साधून कारवाईची मागणी केली आहे. यावेळी बाजार समिती संचालक केशवराव खुरद, राजू चव्हाण, संचालक सुरेश काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चवरे, दिनकर चव्हाण, विष्णू खुरद, पांडुरंग गाढवेसह गावकरी उपस्थित होते.
कामात हलगर्जीपणा करणाऱ्या तलाठ्यावर कारवाई करा- आ. रायमुलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:38 AM