अंगणवाडी सेविकांना आधी शिकवा ना इंग्लिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:35 AM2021-07-30T04:35:57+5:302021-07-30T04:35:57+5:30

पोषण ट्रॅकरवरील कामे सध्या ६ महिने ते ३ वर्षे व ३ वर्षे ते ६ वर्षे या वयोगटातील बालकांना पोषण ...

Teach English to Anganwadi workers first | अंगणवाडी सेविकांना आधी शिकवा ना इंग्लिश

अंगणवाडी सेविकांना आधी शिकवा ना इंग्लिश

Next

पोषण ट्रॅकरवरील कामे

सध्या ६ महिने ते ३ वर्षे व ३ वर्षे ते ६ वर्षे या वयोगटातील बालकांना पोषण आहार देण्यात येतो. पोषण आहार देताना बालकांचे वजन व उंचीची नोंद घेण्यात येते. या सर्व माहितीसह गरोदर महिला ते स्तनदा माता, किशोरवयीन मुले-मुली यांची माहिती भरणे ही कामे पोषण ट्रॅकरच्या माध्यमातून करावी लागतात. उपरोक्त सर्व माहिती अंगणवाडी सेविकांना इंग्रजीमध्ये भरावी लागत आहे. अंगणवाडी केंद्रांतर्गत येणाऱ्या कुटुंबातील माहितीचा यामध्ये समावेश आहे.

माहिती मराठीमध्ये देण्याची परवानगी हवी

पोषण ट्रॅकरमध्ये सर्व माहिती इंग्रजी भाषेतून द्यावी लागते. मला इंग्रजी भाषेचे ज्ञान असल्यामुळे पोषण आहारासह विविध स्वरूपाची माहती भरताना कोणतीही अडचण येत नाही. मात्र बहुतांश सेविकांना इंग्रजी भाषेमुळे खूप व्यत्यय येतो. ट्रॅकरमध्ये मराठी भाषेतून माहिती भरण्याची परवानगी द्यावी.

-रिना राधेश्याम जाधव, अंगणवाडी सेविका.

इंग्रजी भाषेतून माहिती भरताना खूप वेळ लागतो. शिक्षण कमी असलेल्या अंगणवाडी सेविकांना ही माहिती भरताना शिक्षित व्यक्तींची मदत घ्यावी लागते. वेळेच्या आता माहिती भरता यावी, यासाठी मराठी भाषेची सुविधा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून अंगवाडी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील माहिती अचूकपणे देता येईल.

-लक्ष्मी पुरुषोत्तम वानखडे, अंगणवाडी सेविका.

मोबाईलची अडचण वेगळीच

अंगणवाडी सेविकांना लाभार्थी बालकांची ही सर्व माहिती मोबाईलवरून ऑनलाईन भरावी लागते. त्यामुळे ज्यांना इंग्रजीचे ज्ञान आहे, तरी त्यांना माहिती भरताना इतर अडचणींचाही सामना करावा लागताे. त्यामध्ये मोबाईलचीच प्रमुख अडचण समोर येत आहे. मोबाईल न चालणे, रेंज न मिळणे या अडचणीमुळे सेविका त्रस्त आहेत.

जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या : २७१२

जिल्ह्यातील एकूण अंगणवाडी सेविका : २४९७

Web Title: Teach English to Anganwadi workers first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.