अडीच महिन्यापासून शिक्षक बदलीचे त्रांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:56 PM2018-06-19T17:56:39+5:302018-06-19T17:56:39+5:30

बुलडाणा : गेल्या अडीच महिन्यापासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीचे त्रांगडे सुरू असून आता पाचव्या फेरीनंतर संगणक प्रणातील तांत्रिक चुका समोर येत असून त्याचा फटका पात्र शिक्षकांना बसला आहे.

Teacher transfers for two and a half months | अडीच महिन्यापासून शिक्षक बदलीचे त्रांगडे

अडीच महिन्यापासून शिक्षक बदलीचे त्रांगडे

Next
ठळक मुद्देबुलडाणा जिल्हा परिषद शिक्षक बदलीची प्रक्रिया ५ एप्रिल पासून सुरू झाली आहेजिल्हाअंतर्गंत बदली प्रक्रियेत शाळा मिळू न शकलेल्या ३२ असे एकूण २०४ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : गेल्या अडीच महिन्यापासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीचे त्रांगडे सुरू असून आता पाचव्या फेरीनंतर संगणक प्रणातील तांत्रिक चुका समोर येत असून त्याचा फटका पात्र शिक्षकांना बसला आहे. त्यातच शहराजवळ असलेल्या रिक्त पदांवर पहिल्या फेºयांमध्ये नियुक्ती न देता पाचव्या फेरीअखेर थेट आंतरजिल्हा बदलीतील काही मोजक्या शिक्षकांना नियुक्त्या दिल्यामुळे कथितस्तरावर आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. बुलडाणा जिल्हा परिषद शिक्षक बदलीची प्रक्रिया ५ एप्रिल पासून सुरू झाली आहे. मात्र अडीच महिन्यानंतरही बदली प्रक्रिया सुरू असून येणाºया २६ जून रोजी शाळा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक उपस्थित राहणार आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षण बदली प्रक्रियेदरम्यान सध्या पाचवी फेरी सुरू असून त्यात आंतरजिल्हा शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर बदली प्रक्रिया रॅन्डम पध्दतीने म्हणजे शिल्लक राहिलेली जागा संगणकाला आदेश दिल्यानंतर मिळेल ते गाव देण्यात येत आहे. अशा पध्दतीने जवळपास आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या १७२ शिक्षक व जिल्हाअंतर्गंत बदली प्रक्रियेत शाळा मिळू न शकलेल्या ३२ असे एकूण २०४ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी आंतरजिल्हा बदलीस पात्र असलेल्या १७२ शिक्षकांपैकी १२५ शिक्षकांना बदलीचे आदेश देण्यात येत आहेत. त्यामुळे उर्वरित आंतरजिल्हा बदलीस पात्र उर्वरित शिक्षकांना आदेश मिळणे आवश्यक असले तरी त्यांना आदेश कां? देण्यात आला नाही, याबाबचे कारण गुलदस्त्यात आहे.

संगणक प्रणालीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

आंतरजिल्हा बदली झालेले शिक्षकांची नियुक्ती बहुतांश संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील शाळा देण्यात आल्या आहेत. मात्र काही मोजक्या शिक्षकांना सिंदखेड राजा व देऊळगाव राजा व इतर तालुक्यातील बदली प्रक्रियेतील पहिल्या फेरीपासून अद्याप कोणालाही देण्यात न आलेल्या शाळा देण्यात आल्यामुळे संगणक प्रणालीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कथितस्तरावर आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Web Title: Teacher transfers for two and a half months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.