विहिरीत उतरून पकडला दहा फूट लांबीचा साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:38 AM2021-09-21T04:38:32+5:302021-09-21T04:38:32+5:30
शेतकरी उत्तम पायघन यांच्या शेतातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी त्यांच्या शेताच्या शेजारी असणारे अंकुश खरात, ओंकार वाडेकर गेले असता त्यांना ...
शेतकरी उत्तम पायघन यांच्या शेतातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी त्यांच्या शेताच्या शेजारी असणारे अंकुश खरात, ओंकार वाडेकर गेले असता त्यांना या विहिरीत पाण्यात साप तरंगत असल्याचे दिसले. त्यांनी सर्पमित्र वनिता बोराडे यांना संपर्क करून माहिती देताच हिवरा आश्रम येथून सर्पमित्र वनिता बोराडे शेतात दाखल झाल्या. निलेश नाहटा हेसुद्धा घटनास्थळी पोहोचले. सर्व शेतकरीबांधवांना शांत राहण्याचे आवाहन करत सर्पमित्र वनिता बोराडे विहिरीत उतरल्या. त्यांनी अतिशय धाडसाने कोणत्याही उपकरणांची मदत न घेता सरळ आपल्या हाताने या दहा फूट लांबीच्या साधारणत: १५ किलो वजनाच्या सापाला त्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करीत काही क्षणातच पकडून एका थैलीमध्ये बंद केले. वनविभागामार्फत सापाची पशुवैद्यकीय तपासणी करून सोडण्यात येणार असल्याचे सर्पमित्र वनिता बोराडे यांनी उपस्थितांना सांगितले.