सावळावासियांचे ‘थाळी बजाओ’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 01:11 AM2017-08-09T01:11:49+5:302017-08-09T01:12:21+5:30
बुलडाणा : गॅस वाटपामध्ये विलंब होत असल्यामुळे सावळा येथील गावकर्यांनी थाळय़ा वाजवत गांधीगिरी मार्गाने हातामध्ये पैसे व थाळय़ा घेऊन वनपरिक्षेत्र बुलडाणा कार्यालयासमोर मंगळवारी आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गॅस वाटपामध्ये विलंब होत असल्यामुळे सावळा येथील गावकर्यांनी थाळय़ा वाजवत गांधीगिरी मार्गाने हातामध्ये पैसे व थाळय़ा घेऊन वनपरिक्षेत्र बुलडाणा कार्यालयासमोर मंगळवारी आंदोलन केले.
सावळा गावासाठी ७५ गॅस मंजूर करण्यात आले होते. त्यांचा लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी गावकर्यांनी वेळोवेळी वन विभागाच्या अधिकार्यांकडे मागणी केली; मात्र गावकर्यांना न जुमानता गेल्या दोन तीन महिन्यांपासून गावातील गरजू लाभार्थ्यांना वन विभागाकडे वारंवार चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे
गावकर्यांनी जिल्हा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कॅबिनसमोर बसून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांना शांत करत पोलिसांनी मध्यस्ती केली व त्यानंतर आंदोलकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळला. यावेळी गावकर्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी वर्हाडे यांना निवेदन देऊन गॅस वाटपाची सर्व माहिती दिली. त्यावेळेस आंदोलकांची तत्काळ दखल घेऊन आंदोलकांना दोन दिवसात मार्ग काढतो व गॅस देऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलनामध्ये गावातील महिला व गॅस कनेक्शनचे लाभार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मागण्या मान्य झाल्या नाही तर अनिल जगताप व सुरेश जगताप हे आंदोलकांच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्याच्या समोर आत्मदहन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.