बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून, ९ तालुक्यांमध्ये साेमवारी एकही पाॅझिटिव्ह आढळला नाही़ तसेच चार तालुक्यांमध्ये १३ नवे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत़ तसेच २४ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे़. तसेच उपचारादरम्यान स्त्री रुग्णालय, बुलडाणा येथे भंडारी (ता. सिं. राजा) येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहर ३, तालुका नांद्राकोळी १, शेगाव शहर २, सिं. राजा तालुका चांगेफळ १, चिखली तालुका शेलसूर १, मेहकर तालुका भोसा १, लोणार तालुका शेलगाव जहागीर १, खामगाव शहर १, खामगाव तालुका तांबुलवाडी १, परजिल्हा माहोरा (ता. जाफ्राबाद) येथील एका रुग्णाचा समावेश आहे़
११० रुग्णांवर उपचार सुरू
आज रोजी ११०३ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ५ लाख ६७ हजार ४९६ आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ८६ हजार ६१२ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी ८५ हजार ८४१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ११० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ६६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.