अट्टल चोरांना अटक करुन १९ मोटारसायकल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 03:59 PM2019-11-19T15:59:53+5:302019-11-19T16:00:00+5:30
त्यांच्याकडून १९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्यात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पोलीसांना मोटारसायकल चोर तालुक्यातील चिखली सुर्वे रस्त्याकडून येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीव्दारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सापडा रचून त्यांना पकडल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली. पोलीस तपासात पकडण्यात आलेले आरोपी अट्टल सायकलचोर असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून १९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्यात.
वाशिम शहरातील समता नगर , अल्लाडा प्लाट भागातून गत तीन दिवसापूर्वी चोरीस गेलेली मोटारसायकल घेवून शिवाजी राठोड व त्याचा मित्र बद्रीनारायण घुगे हे चिखली सुर्वे रस्त्याने येत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक शिवाजी ठाकरे यांनी आपले अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचारी यांना चिखली सुर्वे रोड पुढील कारवाई साठी रवाना केले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, पोलीस उपनिरिक्षक भगवान पायघन व त्यांचे पथकातील कर्मचाºयांनी दोन्ही आरोपीस अडविले. या दोन्ही आरोपींची चौकशी केली असता मोटारसायकलवरील इसमांचे नाव शिवाजी रामदास राठोड, वय ५० वर्ष, रा. डोंगर खंडाळा, ता.जि.बुलढाणा, ह.मु. भास्कर बिल्डींग शासकीय कर्मचारी निवासस्थान वाशिम व बद्रीनारायण ज्ञानबा घुगे, वय ३९ वर्ष, रा. मांडवा ता.रिसोड जि. वाशिम ह.मु. सिव्हील लाईन वाशिम असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकल विषयी चौकशी केली असता त्यांनी तीन दिवसाआधी समतानगर अल्लाडा प्लॉट भागातुन चोरी केली असल्याची कबुली दिली. वरून सदर मोटारसायकल तपासात जप्त करण्यात आली व दोन्ही इसमांना गुन्हयात अटक केली.
जळगाव, नांदेड, अकोला, हिंगोली,वाशिम जिल्हयात चोरी
शिवाजी रामदास राठोड याने उदरनिवार्हासाठी प्रथम जळगाव येथुन नंतर नांदेड, अकोला, हिंगोली आणि वाशिम जिल्हयातुन १८ मोटारसायकल चोरी केल्या. चोरी केलेल्या मोटारसायकल राठोड व त्याचा मित्र घुगे यांनी वाशिम शहर व परिसरात विक्री केल्या काहिंना उसने पैसे पाहीजेत असे म्हणुन पैसे परत करे पर्यंत गाडी ठेवुन चोरी केलेल्या मोटारसायकलींची विल्हेवाट लावली.
राठोड समाजकल्याण विभागातील कर्मचारी
शिवाजी राठोड याने पुर्वी वाशिम समाजकल्याण विभागात नोकरी केली . त्याची दोन वषार्पुर्वी जळगाव येथे वरिष्ठ काळजीवाहक पदावर बदली झाली . अपघात झाल्याने आजारी रजेवर होता. प्रकृती ठीक झाल्यानंतर त्याने रुजू न होता चोरी सुरु केली.