पश्‍चिम वर्‍हाडात २४ तासांत तीन शेतकरी आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:16 AM2018-03-01T02:16:30+5:302018-03-01T02:16:30+5:30

खामगाव/वाशिम : पश्‍चिम वर्‍हाडात २४ तासात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. याशिवाय विष प्राशन केलेल्या आणखी एका शेतकर्‍याची प्रकृती गंभीर आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांपैकी दोन बुलडाणा तर एक वाशिम जिल्ह्यातील रहिवासी होते. 

Three farmers suicides in 24 hours in West Ward | पश्‍चिम वर्‍हाडात २४ तासांत तीन शेतकरी आत्महत्या 

पश्‍चिम वर्‍हाडात २४ तासांत तीन शेतकरी आत्महत्या 

Next
ठळक मुद्देविष प्राशन केल्याने एक शेतकरी गंभीर, उपचार सुरू 

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव/वाशिम : पश्‍चिम वर्‍हाडात २४ तासात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. याशिवाय विष प्राशन केलेल्या आणखी एका शेतकर्‍याची प्रकृती गंभीर आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांपैकी दोन बुलडाणा तर एक वाशिम जिल्ह्यातील रहिवासी होते. 
नांदुरा येथील  दोन शेतकर्‍यांनी २८ फेब्रुवारी रोजी विष प्राशन केले. यापैकी एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर आहे. तत्पूर्वी, २७ फेब्रुवारी रोजी देऊळगाव मही तालुक्यातील एका शेतकर्‍याने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. अवघ्या २४ तासात दोघांनी आत्महत्या, तर एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. 
नांदुरा तालुक्यातील विजयसिंह उत्तमसिंह जाधव (वय-५६) यांच्याकडे दोन एकर शेती असून, कपाशीच्या उत्पन्नातून  आर्थिक स्थिती सुधारेल, या आशेने यावर्षी जाधव यांनी कपाशी पिकाची लागवड केली होती. मात्र बोंडअळीने संपूर्ण पिकाचे नुकसान झाले. परिणामी,  कर्जाचा डोंगर वाढल्याने नैराश्यातून जाधव यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता विषारी कीटकनाशक प्राशन केले. जाधव यांच्यावर  बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेंबा शाखेचे ४0 हजार रुपयांचे कर्ज आणि कृषी कर्जही होते. कर्जमाफीची घोषणा होऊनही त्यांचे कर्ज अजूनही माफ झालेले नाही. परिणामी, आर्थिक विवंचनेतून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. याशिवाय नांदुरा तालुक्यातीलच खुमगाव बुर्टी येथील शेतकरी प्रभाकर गोंडू हिवाळे यांनी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान त्यांच्या बुर्टी शिवारातील शेतात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रभाकर हिवाळे यांच्या मालकीचे पाच एकर शेत असून, त्यांनी बीटी कपाशीची लागवड केली होती. बोंडअळीच्या हल्ल्यात कपाशीचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून  त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. 

युवा शेतकर्‍याने घेतला गळफास
देऊळगावमही येथून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या वाकी बु. येथील अल्पभूधारक युवा शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी घडली. वाकी बु. येथील रहिवासी रामदास नारायण दराडे (वय २८) या अल्पभूधारक शेतकर्‍याने स्वत:च्या   शेतातील नाल्यामध्ये झाडाला केबल वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

बाळू गाठे यांनी घेतली विहिरीत उडी
कारंजा लाड : तालुक्यातील हिवरा लाहे येथील बाळू नागोराव गाठे (वय ४५) या शेतकर्‍याने कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून २७ फेबुवारी रोजी सायंकाळी ७.३0 वाजताच्या दरम्यान स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली. बाळू गाठे हे २७ फेबुवारी रोजी शेतात जातो म्हणून घरून निघून गेले. गेल्या वर्षांपासून नापिकी व मुलीचा विवाह ह्या खर्च या विवंचनेत असल्याने त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्याकडे ४ एकर शेती असून जिल्हा सहकारी बँकेचे ६0 हजार रुपये कर्ज आहे. 


त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. मुलांचे शिक्षण, तसेच शेतीचा खर्च असह्य झाल्याने बाळूने आत्महत्या केली. ही माहिती धनज पोलीस स्टेशनला हिवरा लाहे येथील सरपंच सागर ढेरे व पोलीस पाटील देवकिसन कवरे यांनी धनज पोलिसांना दिली. 
 

Web Title: Three farmers suicides in 24 hours in West Ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.