व-हाडावर रानडुकराचा हल्ला, तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 06:36 PM2018-04-30T18:36:54+5:302018-04-30T18:36:54+5:30
विवाह सोहळयाकरीता निघालेल्या वधूकडील व-हाडी मंडळींवर रानडुकराने हल्ला चढवीत तिघा जणांना जखमी केल्याची घटना मौजे मोरखेड गावात ३० एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.
मलकापूर - विवाह सोहळयाकरीता निघालेल्या वधूकडील व-हाडी मंडळींवर रानडुकराने हल्ला चढवीत तिघा जणांना जखमी केल्याची घटना मौजे मोरखेड गावात ३० एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.
मौजे मोरखेड येथील वधूकडील वºहाडी मंडळी लग्न सोहळ्या करीता जामनेर तालुक्यातील खातगाव येथील वरमंडळी निघण्याच्या गडबडीत असतांना नदीपात्रातील शेतशिवरातून सुसाट वेगाने आलेल्या रानडुक्कराने वºहाडी मंडळीवर हल्ला चढविला. दरम्यान एकच गोंधळ उडाला. त्यावेळी क्रूझर गाडीत बसण्याच्या तयारीत असलेल्या राजेंद्र बबन जंगले वय ३५ यांना या रानडुकराने शिंगाने धडक देत उचलून फेकले तसेच सौ.ममता विनोद रोकडे (वय ३०) व संतोष अभिमान सोनोने वय ३६ यांच्यावर हल्ला करीत जबर धडक दिली यामध्ये राजेंद्र जंगले हे गंभीररित्या जखमी झाले. तर दोघे जण किरकोळ जखमी झाले. यानंतर रानडुकर सुसाट वेगात पसार झाले. जखमींना पाहुणे मंडळींनी तात्काळ मलकापूर येथे उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मोताळा येथील वनविभाग अधिकाºयांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.