एकाच कुटुंबातील तिघांनी घेतले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:53 AM2017-09-26T00:53:33+5:302017-09-26T00:53:52+5:30
खामगाव : व्याजाची रक्कम अदा केल्यानंतरही रक्कम वसुलीसाठी सुरू असलेल्या सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाच कुटुंबा तील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. तिघांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : व्याजाची रक्कम अदा केल्यानंतरही रक्कम वसुलीसाठी सुरू असलेल्या सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाच कुटुंबा तील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. तिघांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खामगाव येथील जोहार्ले लेआउटमधील देवेंद्र जामोदे यांनी व्यवसायासाठी वाडी येथील निर्मला रामचंद्र कबाडे यांच्याकडून व्याजाने चार लाख रुपये घेतले होते. या पैशांची व्याजासह पर तफेड करण्यात आली; मात्र अतिरिक्त पैशांसाठी कबाडे यांच्याकडून सातत्याने तगादा लावण्यात आला. देवेंद्र जामोदेंसह त्यांचे वडील आणि भावालाही पैशांची मागणी करीत, शिवीगाळ केली. दरम्यान, कबाडे यांचा भाऊ प्रकाश रामकृष्ण गावंडे रा. टिळक मैदान याने देवेंद्र जामोदे यांचा कोर्टासमोरील पानठेला ‘नोटरी’ करून ताब्यात घेतला. तसेच रक्कम वसुलीसाठी सावकाराचा त्रास सुरूच होता. या त्रासाला कंटाळून देवेंद्र जामोदे (३५), श्रीराम जामोदे (६५), नरेंद्र जामोदे (३0) यांनी रविवारी रात्री विष प्राशन केले. ही बाब कळताच कुटुंबीयांनी ितघांना खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, नरेंद्र जामोदे यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने अकोला येथे हलविण्यात आले. अकोला येथे उपचार सुरू असतानाच नरेंद्र जामोदे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात देवेंद्र जामोदे यांच्या तोंडी जबाबावरून शहर पोलिसांनी निर्मला कबाडे आणि प्रकाश गावंडे यांच्याविरुद्ध मुंबई सावकारी अधिनियमाच्या कलम ३२, ३३, सहकलम ३९, महाराष्ट्र सावकारी अधिनियम व भारतीय दंड विधानाच्या कलम ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला.
आणखी सहा तक्रारी!
व्याजाच्या पैशांची परतफेड केल्यानंतरही अतिरिक्त पैशांची मागणी होत असल्याप्रकरणी गणेश ओंकार खंडारे (५0) रा. वाडी यांच्यासोबतच गायत्री प्रशांत धर्माधिकारी रा. शेगाव, विनायक सुरेश जवळकार रा. सुटाळपुरा, शिवकुमार प्रभुदस अ्रठावलकर रा. समता कॉलनी, शैलेश किसनराव दाणे रा. गो पाळनगर, सुनील जांभुरकर रा. सावजी ले-आउट यांचा समावेश असून, खंडारे यांच्या तक्रारीत व्याजाच्या पैशांपायी गावंडे याने जबरदस्तीने घर खरेदी करून घेतल्याचेही नमूद केले आहे. तक्रारीमध्ये निर्मला कबाडे, प्रकाश रामकृष्ण गावंडे, सोनल प्रकाश गावंडे, विजय राजेंद्र कबाडे, अक्षय गावंडे, शुभम यांची नावे आहेत.
सर्च ऑपरेशनमध्ये सापडले आक्षेपार्ह दस्तावेज!
देवेंद्र जामोदे यांच्या तक्रारीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा यांच्या मार्गदर्शनात खामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यू.के. जाधव यांच्या पथकाने सोमवारी सकाळी देवेंद्र गावंडे आणि निर्मला कबाडे यांच्या घराची झडती घेतली अस ता, कोरे बॉन्ड, बक्षीस पत्र, पासबुक, गहाण खत, कोरे चेक आणि इतर आक्षेपार्ह दस्तावेज सापडला असून, अनेकांचा संबंधितांनी छळ केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. पोलिसांनी सदर दस्तावेज जप्त केला आहे.
आता मुलांना दोन घास भरविता येतील!
अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळलेल्या दोन महिलांना पोलीस स्टेशनमध्ये आपले अश्रू अनावर झाले होते. दिवसभर राबराब राबल्यानंतरची कष्टाची कमाई सावकार घेऊन जात हो ता. दरम्यान, आता पोलिसांच्या मदतीने तक्रार दाखल करता आल्याने, दिवाळीत मुलांना दोन घास भरविता येतील, अशा प्र ितक्रिया महिलांनी नोंदविल्या. दरम्यान, पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी पुढाकार घेणार्यांना सावकारांकडून धमक्या मिळल्या; मात्र काहींनी भीक न घालता पोलिसात तक्रारी दाखल केल्या.
खामगाव पोलिसांची संवेदनशीलता!
अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाच कुटुंबातील ितघांनी विष प्राशन केले. यापैकी एका युवकाचा मृत्यू झाला. या परिवाराच्या दु:खात प्रत्यक्ष सहभाग नोंदवित, खामगाव पोलिसांनी दाखविलेल्या संवदेनशीलतेबाबत समाजमनात सोमवारी चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या. जामोदे परिवाराला उ पचारासोबतच नरेंद्र जामोदे यांच्या अंत्यसंस्कारालाही ठाणेदार यू.के. जाधव यांच्यासह पथकाने सढळ मदत केली.
व्याजाच्या पैशांसाठी छळ करणार्या सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा कुणीही निर्णय घेऊ नये. अवैध सावकारांविरोधात निर्भीडपणे पोलिसांत तक्रार नोंदवावी. प्र त्येकाला न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे.
-यू.के. जाधव, पोलीस निरीक्षक,
शहर पोलीस स्टेशन, खामगाव.