शहरं
Join us  
Trending Stories
1
काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
2
“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
3
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी पुन्हा तोडले ओवेसींचे स्वप्न; MIM ला 1 टक्काही मते मिळाली नाही
4
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
5
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
6
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
7
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
9
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
10
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नाना पटोलेंचा अखेर विजय; २०८ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव
12
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
15
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
16
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
17
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
19
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
20
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

गुजरातमधून बुलडाण्यात दाखल होतात खासगी तीन बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 11:03 AM

गुजरात राज्यातून दररोज बुलडाण्यात तीन खासगी बस दाखल होत आहे.

 - संदीप वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली होती. संचारबंदीत शिथीलता देत प्रशासनाने जिल्ह्यांतर्गंत प्रवासास मुभा दिली असली तरी गुजरात राज्यातून दररोज बुलडाण्यात तीन खासगी बस दाखल होत आहे. या बसेसच्या माध्यमातून प्रवाशांची दररोज वाहतुक होत आहे. या प्रवाशांची कुठलीही आरोग्य तपासणी होत नसल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातून दररोज बसेस धावत असून प्रवाशांची ने-आण करीत आहेत. विशेष म्हणजे या बसमधील प्रवाशांची कुठलीही आरोग्य तपासणी होत नसल्याने बुलडाणा शहरात कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील एका खासगी बस चालकावर कारवाई झाल्याने या बसेस काही दिवसांसाठी बंद करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच गुजरात राज्यातून मात्र बसेस सुरूच असून त्यांचा वेळ बदलण्यात आला आहे. गुजरात राज्यात जाण्यासाठी या खासगी बसेस एका प्रवाशाकडून दोन ते तीन हजार रुपये भाडे घेत असल्याचे चित्र आहे. दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रशासनाने विविध नियम व अटी घालून दिल्या आहेत. तसेच परराज्यात प्रवाशी वाहतुक बंद करण्यात आली आहे. तरीही गत महिनाभरापासून गुजरातमधून शेकडो प्रवाशी बुलडाणा शहरात येत आहेत.परिवहन विभागाचे दुर्लक्षबुलडाणा शहरातून खासगी बसेस धावत असताना परिवहन विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. एरव्ही दुचाकी चालकांवर कारवाई करणारे वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचाऱ्यांचेही या खासगी बसेसकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे.

दलालांकडून होते बुकींगया खासगी बससाठी काही दलाल जयस्तंभ चौकात सक्रीय आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रवाशांची बुकींग होते. काही बसेसवर कारवाई करण्यात आल्याने वेळ बदलण्यात आली असून रात्रीतून प्रवाशी वाहतुक होते.

चार ते सहा हजार रुपये भाडेइतर जिल्ह्यातून बुलडाणा, मेहकरमध्ये येणाºया खासगी बस प्रवाशांकडून तब्बल चार ते सहा हजार रुपये भाडे वसुल करीत आहेत. दुसरा पर्याय नसल्याने प्रवाशीही जास्तीचे भाडे देउन धोकादायक प्रवास करीत आहेत.

प्रवाशी वाहतुक करणाºया परराज्यातील खासगी बस व इतर वाहनांवर कारवाई सुरूच आहे. आतापर्यंत १२ वाहन चालकांना मेमो दिले आहेत. तसेच ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे.- जयश्री दुतोंडे, उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी, बुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाGujaratगुजरात