शासकीय अनुदान हडपणाऱ्या अधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 10:40 AM2020-06-13T10:40:41+5:302020-06-13T10:40:53+5:30
बनावट दस्तऐवज तयार करून ४ लाख ११ हजार ८९४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी १२ जून रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
बुलडाणा: शासकीय अनुदान हडपणाºया येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांसह तीन जण एलसीबीच्या जाळ्यात अकडले आहेत. बनावट दस्तऐवज तयार करून ४ लाख ११ हजार ८९४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी १२ जून रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश पांडुरंग चिमणकर, शिवाजीराजे भोसले, ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्था बुलडाणाचे अध्यक्ष किरण भगवान धंदर, सचिव शरद प्रकाश बावस्कर व ओम साई कार केअर गॅरेजसह जागेचे मालक नीलेश अरविंद शिंदे यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश पांडुरंग चिमणकर यांनी चिखली रोडवर ओम साई कार केअर गॅरेजच्या नावावर शासकीय अनुदानाची प्रक्रिया पूर्ण केली होती. जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्रला लागणाºया सर्व कागदपत्रांची पुर्तताही केली. त्यासाठी इन्स्ट्युट चालक व इतर दोघांना हाती धरून शासकीय प्रक्रिया पूर्ण केली. परंतू प्रत्यक्षात चिखली रोडवर साई कार केअर नावाचे इन्स्ट्युटचे कार्यरत नव्हते. शासकीय अनुदानासाठी सर्व बनावट कागदपत्र तयार करून प्रक्रिया पूर्ण केली. यामध्ये ४ लाख ११ हजार रुपयांचे अनुदान जमा झाले. परंतू यासंदर्भात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे काही महिन्यापूर्वीच तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार तपास चके्र फिरविली असता, हा सर्व प्रकार बनावट असल्याचे दिसून आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशी अंती इन्स्ट्युट नसतानाही शासकीय अनुदानाचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान, यापक्ररणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिमचे पोलीस उपअधीक्षक शंकर व्ही. शेळके यांनी १२ जून रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून शासनाची ४ लाख ११ हजार ८९४ रुपयांची फसवणूक चौघांविरोधात बुलडाणा शहर पोलिसांत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)