शेगावात काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र
By admin | Published: July 12, 2014 10:21 PM2014-07-12T22:21:11+5:302014-07-12T22:21:11+5:30
काळाची गरज ओळखून भारॉकामध्ये झालेले दोन्ही गट एकत्र आल्याने पुन्हा भाराकाँची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शेगाव : शेगाव नगराध्यक्ष पदावर येणार्या काळाची गरज ओळखून भारॉकामध्ये झालेले दोन्ही गट एकत्र आल्याने पुन्हा भाराकाँची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुठलेही नवे समिकरण नव्याने घडले नाही तर नगराध्यक्ष पदावर काँग्रेसचे बंडूबाप्पू देशमुख विराजमान होतील यात शंका नाही. शेगाव नगर पालिकेत एकुण सदस्य संख्या २५ असून यामध्ये भारॉकाचे १0 भाजप, सेनेचे ९ तर नगरविकास आघाडीचे ६ सदस्य आहेत. सुरवातीला झालेल्या कराराप्रमाणे त्यावेळेस जळगाव जामोद विधानसभा क्षेत्राचे असलेले नेते रामविजय बुरुंगले आणि नगरविकास आघाडीचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी भाजप सेना सत्तेवर होवू नये म्हणून भाराकाँची सदस्य संख्या १0 असल्यानंतरही आघाडीच्या गळ्यात माळ टाकून सुरवातीचे सव्वा वर्षे नगराध्यक्ष पद त्यांच्याकडे तर नंतरचे सव्वा वर्षे भारकॉकडे अशा प्रकारची युती अस्तीत्वात आली होती. यावेळेस रामविजय बुरुगले यांनी आपल्या १0 सदस्यांना विश्वासात घेवून पुढील सव्वा वर्षामध्ये बुरुंगले परिवार सदस्य नगराध्यक्ष पदावर बसणार नाही तर सर्व संमतीने आपण ज्याची निवड करणार तो मला मान्य राहणार अशी हमी दिली होती. परंतु आघाडीचे प्रथम सव्वा वर्षे संपल्यानंतर बुरुंगले यांनी आपले शब्द फिरवला, त्यामुळे भाराकाँ मध्ये असंतोष निर्माण होवून प्रमोद उर्फ बंडूबाप्पू देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये ६ जणांचा एक वेगळा गट तयार झाला व गटनेतेपदी बंडुबाप्पुची वर्णी लावण्यात आली. याचा परिणाम म्हणून स्थायी समित्यांच्या वेळेस २ समित्या बंडूबाप्पु गटाला तर दोन भाजप सेनेला मिळाल्या. आता नगराध्यक्ष पद हे ओबीसी असल्याने तसेच बंडूबाप्पू देशमुख हे भाराकॉचे जेष्ठ सभासद असल्याने त्यांनी यावेळी नगराध्यक्ष पदावर आपली दावेदारी प्रखरपणे मांडली. तर पक्षाचा नगरध्यक्ष बनत असल्याने पक्षाने काढलेला ह्यव्हीपह्ण वर बुरुंगले गटानेही स्वीकारला आहे. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडीवरुन बंडुबाप्पु यांची नगराध्यक्ष पदावर निवड ही जवळपास निश्चित समजल्या जात आहे. मात्र उपाध्यक्ष पदाचा घोळ कायमच आहे. कारण आतापर्यंंत बंडुबाप्पु गटाचे ह्यचाणक्य सारर्थीह्ण समजल्या जाणारे किरण बाप्पु देशमुख यांनी मोठे राजकारण उभे केले मात्र उपाध्यक्ष पदासाठी त्यांचीही कसरत होणार आहे.