बुलडाणा : बुलडाणा पोलीस दलातील ४४२ कर्मचार्यांच्या सर्वसाधारण बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांनी केल्या. मागील पाच वर्षांपासून बदलीपात्र कर्मचारी बदल्यांची वाट पाहात होते. अखेर पोलीस अधीक्षक यांनी एका आदेशान्वये या बदल्या केल्या. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षकांच्या ४६, पोलीस हवालदारांच्या ११३, पोलीस नाईक १३६ आणि १४७ पोलीस शिपायाच्या बदल्यांचा समावेश आहे. ज्या कर्मचार्यांना एकाच ठिकाणी पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेली असेल अशा प्रशासकीय बदल्या जिल्हास्तरीय आस्थापना मंडळाकडून करण्यात येतील, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे. *विनंतीवरून बदल्यावर नंतर निर्णययाशिवाय ज्या पोलीस कर्मचार्यांनी त्यांच्या कौटुंबिक कारणास्तव विनंतीवरून बदल्याचे अर्ज सादर केलेले आहेत. त्यांच्या प्रकरणांची व कागदपत्रांची छानणीनंतर करण्यात येईल. व नियमाप्रमाणे विनंती बदल्यांची कारवाई करण्यात येईल, असे अपर पोलीस अधीक्षक र्श्वेता खेडेकर यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.*कर्मचा-यांमध्ये असंतोषदरम्यान, झालेल्या बदल्यांमध्ये पोलीस कर्मचारी नाराज असल्याचे बोलल्या जाते. मध्यंतरी अनेक कर्मचार्यांनी आपल्या कौटुंबिक कारणांमुळे बदल्यांचे अर्ज केले होते.; मात्र या अर्जावर विचार तर झालाच नाही., उलट अशा कर्मचार्यांना मानसिक त्रास देऊन त्यांना टार्गेट करण्यात आल्याची माहिती कर्मचार्यांनी दिली. तथापि, डिसिप्लीनच्या नावाखाली कर्मचार्यांना हे सर्व सहन करावे लागते.
बुलडाणा जिल्ह्यातील ४४२ पोलीस कर्मचा-यांच्या बदल्या
By admin | Published: May 03, 2015 2:07 AM