चिखलीत अध्यक्षपदासाठी दोन अर्ज
By Admin | Published: October 29, 2016 02:46 AM2016-10-29T02:46:48+5:302016-10-29T02:46:48+5:30
चिखली न.प. सदस्यपदासाठी दहा दाखल झाले.
चिखली, दि. २८- नगर पालिकेच्या निवडणुकीत नशिब आजमावण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा एका दिवसाआधी अध्यक्ष पदासाठी दोन तर सदस्यपदासाइी १0 उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दाखल केले आहेत. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार्यांमध्ये रासपच्या संगीता दत्ता खरात आणि काँग्रेसच्या करुणा सुभाषआप्पा बोंद्रे यांचा समावेश आहे. नगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. तत्पूर्वी या लढतीत निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी जवळपास निश्चित असलेल्या रासपच्या संगीता दत्ता खरात व काँग्रेसच्या करूणा सुभाषआप्पा बोंद्रे यांच्यासह सदस्यपदासाठी १0 उमेदवारांनी २८ ऑक्टोबर पर्यंंत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान चिखली पालिकेच्या निवडणुकीत निवडणूक लढवू ईच्छीणार्यांची संख्या अधिक असल्याने २९ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी मोठी झुंबड उडण्याची चिन्हे आहेत. तसेच अर्जासोबत राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची ए.बी.फॉर्म लावले जाणार असल्याने शेवटच्या दिवशी चिखली नगर पालिकेच्या रिंगणातील लढती काही प्रमाणात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. नगर पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २४ ऑक्टोबर पासून सुरूवात झालेली आहे. मात्र चिखली नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदासह एकूण २७ जागांसाठी केवळ बारा उमेदवारांव्यतिरिक्त उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फारसा कुणी उत्साह दाखविला नव्हता. यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या संगीता दत्ता खरात आणि काँग्रेसच्या करुणा सुभाषआप्पा बोंद्रे या दोघींनी अध्यक्षपदासाठी तर रविंद्र किसन तोडकर, प्रकाश शंकरराव शिंगणो, संगीता संतोष लोखंडे, सुदर्शन नारायण खरात, शेखर विनायक बोंद्रे, विजय राजु नकवाल, गोपाल किसनराव देव्हडे, आकाश प्रकाश गाडेकर, शेख जावेद शेख शफिक आणि सतीष गंगाधर शिंदे यांनी नगर पालिका सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंंत सर्वच उमेदवार वाट पाहत असल्याचे दिसून येत असून यामुळे शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी झुंबड उडणार आहे.