इंग्लंडमधून आलेले दोघे पॉझिटिव्ह, महिनाभरात जिल्ह्यात नऊ जण झाले दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:18 AM2020-12-28T04:18:19+5:302020-12-28T04:18:19+5:30
दरम्यान, २१ डिसेंबर रोजी खामगावात परतलेल्या या नागरिकांच्या निकट संपर्कातील सर्वांचे ट्रेसिंग आरोग्य विभागाचे एक खास पथक करत असून, ...
दरम्यान, २१ डिसेंबर रोजी खामगावात परतलेल्या या नागरिकांच्या निकट संपर्कातील सर्वांचे ट्रेसिंग आरोग्य विभागाचे एक खास पथक करत असून, संबंधितांचे स्वॅब घेण्यात येऊन ते बुलडाणा येथील प्रयोगशाळेसह पुण्यातील एनआयव्ही कडेही पाठविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
रविवारी सकाळीच एक पथक बुलडाण्यावर खामगावात गेले होते. त्यांच्याकडून अत्यंत बारकाईने हे कॉन्टक्ट ट्रसिंग करण्यात येत आहे. सोबतच खामगावमधील संबंधित परिसर सील करून कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितेल. हे प्रकरण आरोग्य विभागाने गांभीर्याने घेतले आहे.
कोणत्या देशातून
किती प्रवासी आले?
जिल्ह्यात इंग्लंड, फिलिपािन्स, किर्गीस्तान, हाँगकाँग, जर्मनी, इटली, आखाती देशातून प्रामुख्याने प्रवासी आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.
सात जणांच्या चाचण्या निगेटिव्ह
गेल्या एक महिन्यात जिल्ह्यात इंग्लंडमधून नऊ प्रवासी जिल्ह्यात आले असून, त्यातील सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. खामगावातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
एप्रिलपासून विदेशातून एकूण कितीजण आले
२३३ एप्रिल महिन्यापासून बुलडाणा जिल्ह्यात आजपर्यंत २३३ प्रवासी विदेशातून आलेले आहेत. किर्गीस्तानची राजधानी बिश्केक येथून आलेले सहा प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले होते. ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत २२२ फ्लाइटमधून जिल्ह्यात १०५ नागरिक परदेशातून परतले होते. आता नव्याने माहिती घेण्यात येत आहे.
विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?
विदेशातून येणाऱ्यांची मुंबई विमानतळावरच तपासणी करण्यात येते. इंग्लंडमधील विषाणूसंदर्भात गेल्या आठवड्यात अलर्ट मिळाला होता. त्यापूर्वी आलेल्यांची तपासणी झाली नव्हती. त्याउपरही जिल्ह्यात आलेल्या विदेशी नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येऊन संस्थात्मक विलगीकरणात व नंतर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात येते.