धावत्या रेल्वेतून पडून यवतमाळ जिल्ह्यातील दोन युवक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 02:42 PM2019-06-02T14:42:24+5:302019-06-02T14:43:10+5:30

नांदुरा :  मुंबईला कामासाठी जाणारे दोन युवक धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना १ जुनच्या रात्री १०.३० वाजेदरम्यान नांदुरा रेल्वे स्थानकनजीकच्या पहिल्या गेटजवळ घडली . 

Two youths of Yavatmal district seriously injured after falling by running trains | धावत्या रेल्वेतून पडून यवतमाळ जिल्ह्यातील दोन युवक गंभीर जखमी

धावत्या रेल्वेतून पडून यवतमाळ जिल्ह्यातील दोन युवक गंभीर जखमी

googlenewsNext

- सुहास वाघमारे
नांदुरा :  मुंबईला कामासाठी जाणारे दोन युवक धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना १ जुनच्या रात्री १०.३० वाजेदरम्यान नांदुरा रेल्वे स्थानकनजीकच्या पहिल्या गेटजवळ घडली . 
 नेर जिल्हा यवतमाळ येथील ८ते १० युवक कामाकरीता मुंबईला जाण्यासाठी विदर्भ एक्स्प्रेस ने निघालेले होते. दरम्यान नांदुरा रेल्वे स्थानकावरुन गाडी पुढे जाताच गाडीमधून अक्षय सुरजुशे वय २२वर्षे व मनीष पंचबुध्दे वय २६ वर्षे हे दोघेही पडून गंभीर जखमी झाले .घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाऊंडेशन चे विजय वानखडे , ईश्वर चांभारे व निलेश राजपूत आदींनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी युवकांना तात्काळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरीता दाखल केले मात्र प्रकृती अत्यावस्थामुळे त्या गंभीर युवकांना पुढील उपचारार्थ खामगाव येथे हलविण्यात आले आहे.

Web Title: Two youths of Yavatmal district seriously injured after falling by running trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.