लाेणार तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळासह पाऊस झाला. काही भागांत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे या भागातील उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. सुमारे अर्धा तास चाललेल्या पावसामुळे जागोजागी चिखलाचा खच पडल्याचे दिसून आलेय. विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे या भागातील फळबागासह उन्हाळी भुईमूग पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ढगांच्या गडगडाटासह अनेक भागांत दुपारी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे या भागातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
वातावरणात गारवा
मंगळवारी दुपारी अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पाऊस तब्बल एक तास हलक्या ते मध्यम स्वरूपात कोसळत राहिला. त्यामुळे उन्हाळ्याच्या झळा कमी होऊन अचानक गारवा निर्माण झाला आहे.