किनगाव जट्टू परिसरात उडीद, मुगाला फुटले कोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:38 AM2021-09-27T04:38:00+5:302021-09-27T04:38:00+5:30

या आठवड्यात संततधार कमी-अधिक पाऊस सुरू असल्याने अतिपावसामुळे उडीद पिकाच्या झाडाच्या मुळ्या ढिसूळ झाल्यामुळे शेंगा तोडत असताना ...

Urad in Kingao Jattu area, Mugala sprouted sprouts | किनगाव जट्टू परिसरात उडीद, मुगाला फुटले कोंब

किनगाव जट्टू परिसरात उडीद, मुगाला फुटले कोंब

googlenewsNext

या आठवड्यात संततधार कमी-अधिक पाऊस सुरू असल्याने अतिपावसामुळे उडीद पिकाच्या झाडाच्या मुळ्या ढिसूळ झाल्यामुळे शेंगा तोडत असताना पूर्ण झाडच उपटून येत असल्याने

शेंगा तोडता येत नाहीत. त्यामुळे तोडणीला आलेल्या उडदाच्या शेंगाची झाडे परिसरातील शेतकरी उपटून घरी आणून तोडणी करताना दिसत आहेत. हे करीत असताना खूप त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे परिसरातील पांदण रस्ते अतिपावसामुळे चिखलमय झाल्यामुळे डोक्यावर ओझे घेऊन चालता येत नसल्यामुळे फेर घेऊन ऑटोच्या साह्याने घरी आणावे लागत असल्याने आर्थिक झळ सहन करावे लागत आहे. गतवर्षीसुद्धा उडीद व मूूग सोंगणीवेळी अतिवृष्टी झाल्याने उडीद व मुगाच्या शेंगांना झाडावरच कोंब फुटल्याने लागलेला खर्च वसूल तर झालाच नव्हता परंतु डाळी पुरते सुद्धा मूग झाले नव्हते.

Web Title: Urad in Kingao Jattu area, Mugala sprouted sprouts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.