साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:31 AM2021-02-05T08:31:21+5:302021-02-05T08:31:21+5:30

शासनाच्या वतीने दरवर्षी पोलिओ डोज पाजण्यासाठी विषेश मोहीम राबविण्यात येत असून ३१ जानेवारीला संपूर्ण देशात ही मोहीम राबविण्यात येत ...

Vaccination today at Sakharkheda Primary Health Center | साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज लसीकरण

साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज लसीकरण

Next

शासनाच्या वतीने दरवर्षी पोलिओ डोज पाजण्यासाठी विषेश मोहीम राबविण्यात येत असून ३१ जानेवारीला संपूर्ण देशात ही मोहीम राबविण्यात येत आहे. साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या साखरखेर्डा , शिंदी , राताळी , मोहाडी , सवडद , गुंज , वरोडी , शेवगा जहागीर , सावंगी भगत , गोरेगाव , उमनगाव , पांग्रीकाटे , सायाळा , लिंगा , बाळसमुंद्र , राजेगाव , जागदरी , जनुना , तांडा , शेंदुर्जन , पिंपळगाव सोनारा , तांदूळवाडी या ठिकाणी ४१ बुथ स्थापन करण्यात आले आहेत . सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ० ते ५ वयोगटातील मुलांना पोलिओचा डोज दिल्या जाणार आहे . यासाठी उपकेंद्रावरील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका , आशा सेविका , अंगणवाडी मदतनीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे . साखरखेर्डा आणि शेंदुर्जन येथील बसस्थानकावर बुथ राहणार असून एक मोबाईल किम कार्यरत ठेवण्यात आली आहे . प्रत्येक मातांनी आपल्या पाल्याला पोलिओचा डोज पाजण्यासाठी बूथवर आणावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुरुशे यांनी केले आहे .

Web Title: Vaccination today at Sakharkheda Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.